Join us

कंगना-मलाइका अरोरा घालतात आयफोन एक्सपेक्षाही महागडे शूज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 16:03 IST

सेलिब्रिटीज आपली हायलाइफ स्टाइल दाखविण्यासाठी विविध फंडे वापरत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणौत आपल्या आगामी चित्रपटासंबंधीच्या पार्टीत ...

सेलिब्रिटीज आपली हायलाइफ स्टाइल दाखविण्यासाठी विविध फंडे वापरत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणौत आपल्या आगामी चित्रपटासंबंधीच्या पार्टीत खास अंदाजात बघावयास मिळाली होती. ब्लॅक लूकमध्ये दिसत असलेल्या कंगनाने यावेळी खास शूज कॅरी केले होते. ब्लॅक, ब्राउन आणि मस्टर्ड यलो रंगाच्या बेल्ट स्टाइल बकल्सचे हे लेदर बूट्स अमेरिकन फॅशन लेबल टॉम फॉर्डचे होते. अशाप्रकारचे शूज इटली येथे बनविले जातात. या शूजचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे याची किंमत ही हजारोंच्या नव्हे तर लाखांच्या घरात आहे. होय, शूजची किंमत जवळपास १.२० कोटी रूपये आहे. एखाद्या आयफोन एक्सपेक्षाही महागडे असलेले हे शूज कंगणाच्या रूपात भर पाडणारे ठरताना दिसत होते. या अगोदर आपल्या स्टाइल स्टेटमेंटसाठी ओळखली जाणाºया अभिनेत्री मलाइका अरोराने देखील काहीशा अशाच अंदाजात एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी मलाइकाने कॅरी केलेल्या बेल्टची सर्वत्र चर्चा रंगली होती. कारण तिने कॅरी केलेला बेल्ट हा खूपच महागडा होता. डबल जी डिझाइनच्या गुची बेल्टची किंमत सुमारे ७७ हजार इतकी होती. या बेल्टचा ब्रॅण्ड लेवल मोत्यांनी तयार केला होता. हा बेल्ट घालून जेव्हा मलाइका सार्वजनिक ठिकाणी दिसली तेव्हा तिच्या लूकची एकच चर्चा रंगली होती. यावेळी मलाइकाचा अंदाज बघण्यासारखा होता. ती खूपच हॉट दिसत होती. वास्तविक मलाइकाला तिच्या हटके लाइफस्टाइलसाठी ओळखले जाते. ती नेहमीच आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी काहीतरी हटके करीत असते.