कंगना, कॅटरिना आणि परिणीता यांनी का नाकारला ‘सुलतान’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 10:34 IST
‘सुलनान’ चित्रपटाने कमाईच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड ब्रेक केले असून सलमानसह अनुष्का शर्मा या चित्रपटाच्या यशाचे फळ चाखत आहे. मात्र ...
कंगना, कॅटरिना आणि परिणीता यांनी का नाकारला ‘सुलतान’
‘सुलनान’ चित्रपटाने कमाईच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड ब्रेक केले असून सलमानसह अनुष्का शर्मा या चित्रपटाच्या यशाचे फळ चाखत आहे. मात्र बॉलिवूडमधल्या तीन दिग्गज अभिनेत्रींनी सुलतान चित्रपट नाकारल्यामुळे अनुष्काला हा चित्रपट नशिबाने मिळाला असे म्हणावे लागेल. सुरुवातीला कंगना राणावतला या चित्रपटात घेण्याचा विचार होता. आणि तिला याबाबत विचारणादेखील झाली होती. मात्र तारखांचे कारणे पूढे करून हा चित्रपट कंगनाने नाकारला. मात्र चित्रपटाची भूमिका कमी महत्त्वाची असल्याने तिने चित्रपट नाकारला अशी चर्चा सर्वत्र होती. कतरिना कैफलाही या चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली होती. पण कतरिना तेव्हा रणबीरबरोबर रिलेशनशीपमध्ये असल्यानं तिनं सलमानचा चित्रपट नाकारल्याचं बोललं जातंय. कतरिनानंतर परिनिती चोप्राच्या नावाचीही सुल्तानसाठी चर्चा सुरु होती. आदित्य चोप्रांना परिनितीला सुल्तानमध्ये घ्यायची इच्छा होती, पण तोपर्यंत अनुष्काचं नाव आरफाच्या भूमिकेसाठी निश्चित करण्यात आलं होतं.