Join us  

भारतीय क्रिकेटपटूंची तुलना 'धोबीच्या कुत्र्याशी' करणाऱ्या कंगना राणौतच्या ट्विटवर कारवाई

By स्वदेश घाणेकर | Published: February 04, 2021 1:57 PM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ( Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत राहते.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ( Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत राहते. सामाजिक तेढ निर्माण होईल, असे कोणतेही ट्विट न करण्याची तंबी ट्विटरकडून तिला देण्यात आली होती. पण, तरीही गुरुवारी तिनं शेतकरी आंदोलनावरून वादग्रस्त ट्विट केलेच. यावेळी तिनं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर निशाणा साधलाच, परंतु भारतीय क्रिकेटपटूंबद्दलही अपशब्द वापरले. त्यामुळे ट्विटरने तिचे ते ट्विट डिलिट केले. नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.  India vs England : चेंजिंग रुमबाहेर घसरून पडला अन् इंग्लंडच्या सलामीवीराला घ्यावी लागली माघार

राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी पाठींबा दिल्यानंतर आता वेगळेच वळण घेतले आहे. बाहेरच्या व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खूपसू नये असा पलटवार देशातील अनेक सेलिब्रेटींनी केली. त्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar), विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. पण, क्रिकेटपटूंच्या या भूमिकेवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं शंका उपस्थित केली आणि शेतकऱ्यांना पुन्हा दहशतवादी म्हणत क्रिकेटपटूंचे कान टोचले. भारतीय क्रिकेटपटूंची अवस्था, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का!; कंगना राणौतची जहरी टीका 

''हे सर्व क्रिकेटर त्यांची अवस्था धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, अशी झाल्यासारखे का बोलत आहेत. देशात क्रांती घडवणाऱ्या कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध का, हे ते का विचारत नाहीत. हे सर्व दहशतवादी आहेत... हे एवढ बोलायला घाबरताय कशाला?,''असं बॉलिवूड अभिनेत्रीनं ट्विट केलं होतं. पण, आता ते ट्विटरकडूनच ट्विट करण्यात आले आहे. 'तुला माघारी बोलावण्याचा निर्णय योग्यच होता'; सचिन तेंडुलकरच्या ट्विटनंतर राहुल द्रविड होतोय ट्रेंड!

टॅग्स :कंगना राणौतरोहित शर्माशेतकरी संपट्विटर