कंगना राणौतने ओढवून घेतली आणखी एका दिग्दर्शकाची नाराजी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 15:12 IST
कंगना राणौत आणि दिग्दर्शक व निर्माता करण जोहर यांच्यातील शाब्दिक युद्ध विकोपाला पोहोचले असताना आता एक नवी बातमी आहे. ...
कंगना राणौतने ओढवून घेतली आणखी एका दिग्दर्शकाची नाराजी!
कंगना राणौत आणि दिग्दर्शक व निर्माता करण जोहर यांच्यातील शाब्दिक युद्ध विकोपाला पोहोचले असताना आता एक नवी बातमी आहे. ही बातमी कंगनासाठी काहीशी चिंतेची ठरू शकते. होय, करणसोबतच आणखी एक दिग्दर्शक कंगनावर नाराज असल्याची खबर आहे. हा दिग्दर्शक कोण? तर ‘तनू वेड्स मनु’चे दिग्दर्शक आनंद राय.आनंद राय यापुढे कंगनासोबत काम करू इच्छित नाहीत, अशी खबर आहे. ‘तनू वेड्स मनु’ आणि याचा सीक्वल ‘तनू वेड्स मनु रिटर्न’ या दोन्ही चित्रपटांमध्ये कंगना लीड रोलमध्ये होती. हे दोन्ही सिनेमे कंगनाच्या सर्वाधिक हिट चित्रपटांपैकी एक आहेत. पण आता आनंद राय कंगनावर नाराज आहेत. त्यामुळे ‘तनू वेड्स मनु’ सीरिजच्या पुढच्या सिनेमात कदाचित कंगनाऐवजी दुसºया अभिनेत्रीची वर्णी लागू शकते. असे झालेच तर आनंद यांची नाराजी ओढवून घेणे, कंगनाला महागात पडू शकते.आनंद राय यांच्या एका जवळच्या सूत्रांच्या मते, कंगनाचा गर्विष्ठ स्वभाव आनंद यांच्या नाराजीचे खरे कारण आहे. कंगणाचे अरेरावीचे वागणे पाहून आनंद यापुढे कंगनासोबत काम करण्यास उत्सूक नसल्याचे समजते. खरे तर आनंद राय कंगनावर नाराज असल्याची खबर यापूर्वीही आली आहे. त्यामुळे करणपाठोपाठ आनंद रायसारख्या आणखी एका नामी दिग्दर्शकाची नाराजी ओढवून घेणे कंगनाला अजिबात परवडणारे नाही. कंगनाने बराच संघर्ष केलाय. अनेक आव्हानांना तोंड देत तिने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, हे सगळे खरे. पण असे असले तरी बॉलिवूडसारख्या बेभरवशाच्या उद्योगात प्रत्येकाना दुखावत फिरणे कंगनाने सोडायला हवे. होय ना?