Join us  

तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...! कंगना राणौतने शेअर केले सुपर ग्लॅमरस फोटो, झाली ट्रोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 10:39 AM

कंगनाच्या आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड लूकमुळे इंटरनेटवर धुमाकूळ

ठळक मुद्दे‘धाकड’ या सिनेमात कंगना एजंट अग्नीची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात अर्जुन रामपाल व दिव्या दत्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) चर्चेत असते ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे. सध्या मात्र ही ‘पंगा गर्ल’चर्चेत आहे ती तिच्या सुपर हॉट फोटोंमुळे. होय, कंगनाने इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही सुपर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. मात्र काही लोकांना तिचा हा सुपर ग्लॅमरस अवतार फारसा रूचलेला दिसत नाही. सोशल मीडियावरच्या काही प्रतिक्रियांवरून तरी हेच दिसतेय.कंगना सध्या बुडापेस्ट येथे ‘धाकड’ (Dhaakad) या आगामी सिनेमाचे शूटींग करतेय. शूटींग संपले आणि यानंतर रॅपअप पार्टीआधीचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती कोर्सेट ब्रालेट आणि पँटमध्ये दिसतेय. तिने फक्त हे फोटो शेअर केले नाहीत तर गालिबचा एक ‘शेर’ही शेअर केला. ‘मोहब्बत में नहीं फर्क जीने और मरने का, उसी को देख कर जीते हैं जिस काफिर पे दम निकले...,’ असा हा शेर आहे.

कंगनाने हे फोटो शेअर करताच  व्हायरल झालेत. काहींनी मात्र यावरून कंगनाला चांगलेच ट्रोल केले. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती कंगना, इतके वाहयात कपडे यार, असे एका युजरने लिहिले. ‘ओह... संस्कार आणि संस्कृतीवर तूच भाषण देतेस ना?,’ असा सवाल अन्य एका युजरने केला.

दुस-या एका युजरनेही काहीशी अशीच प्रतिक्रिया दिली. मुखवटे कधीही घातक असतात, हे समजून घे, असे त्याने लिहिले. कपड्यांवरुन अनेकदा इतर अभिनेत्रींना सल्ले देते आणि स्वत: अशा कपड्यांमध्ये पोज देऊन फोटो पोस्ट करते, असं म्हणत तिला ट्रोल केलं जात आहे.‘धाकड’ या सिनेमात कंगना एजंट अग्नीची भूमिका साकारणार आहे. या सिनेमात अर्जुन रामपाल व दिव्या दत्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय लवकरच कंगना ‘थलायवी’ व ‘तेजस’ या सिनेमातही दिसणार आहे.

टॅग्स :कंगना राणौत