Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कंगना रानौत म्हणते, मी प्रतिकार केला म्हणूनच विजेती ठरेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 20:12 IST

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रानौत व हृतिक रोशन यांच्यातील वाद अद्याप शमलेला नाही. मात्र यात एक वळण नक्कीच आले आहे. ...

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रानौत व हृतिक रोशन यांच्यातील वाद अद्याप शमलेला नाही. मात्र यात एक वळण नक्कीच आले आहे. दिल्लीत एका कार्यक्रमासाठी हजर असलेल्या कंगनाने हृतिकचे नाव न घेता त्यासोबत आपले प्रेमसंबध असल्याचे सांगितले. हे सांगत असताना ती भावनिक झाली होती हे विशेष. नवी दिल्ली येथे झालेल्या ‘रिबॉक फिट टू फाइट’  पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेली कंगना म्हणाली की, महिलांना क्रू रपणाला समोरे जाता तेव्हा काय होते. मी अशा क्रूर व्यक्तिंशी खंबीरपणाने लढली आहे. ज्यावेळी मी लढत होते तेव्हा मला एक स्त्री म्हणून दु:ख सहण करावे लागले, त्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. जेव्हा मी पत्रे लिहिली ती जगासमोर अतिशय क्रू रपणे जगासमोर आली. त्यावेळी एक व्यक्ती म्हणून मला कसे वाटेल याचाही विचार केला गेला नाही. आपल्या जवळच्या व्यक्तींना लिहिलेल्या पत्रातून आपण भावना व्यक्त करीत असतो. मी रूममध्ये असताना अनेक रात्री रडली आहे. मला जगासमोर नग्न झाल्यासारखे वाटत होते. मात्र मी याचाही तेवढ्याच प्रतिकार क्षमतेने विरोध केला. कारण याचमुळे मी स्वत:ला विजेती म्हणू शकणार होते. यावेळी तिने, तेरे प्यार मे डुबे हुऐ खत मै जलाता कैसे.. या गझलेच्या ओळी म्हणून दाखविल्या. याच कार्यक्रमादरम्यान कंगनाने तिच्या आयुष्याशी मिळतीजुळती एक क था सांगितली. ज्यात एक मुलगी, एक मुलगा आणि त्यांची प्रेमकथा होती. मात्र, तू एक सामान्य मुलींप्रमाणे नाहीस. ही भीती दाखवित प्रियकराने नकार दिला. यानंतर या प्रेमकहाणीचे रुपांतर एका शोकांतिकेत झाले, असेही कंगना म्हणाली. कंगना रानौत व हृतिक रोशन यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. दोन्ही बाजूने वकिलांची फौज आरोप करीत आहे. आता कंगनाने आपल्या प्रेमाची अप्रत्यक्ष कबुली दिल्याने आता पुढे काय होईल हे तर येणारा काळच सांगेल