Join us  

करणने काय बनवले तर बकवास सिनेमे...! शिवसेना सोडून अचानक करण जोहरवर का घसरली कंगना राणौत?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 6:20 PM

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर बरसणारी कंगना आज अचानक पुन्हा एकदा करण जोहरवर बरसली.

ठळक मुद्देकाळेधंदे लपवण्याचे प्रयत्न करू नका, असे दुसरे ट्विट तिने केले. यात तिचा इशारा करण जोहरकडे होता.

शिवसेना व कंगना राणौतचा वाद आता करण जोहरपर्यंत पोहोचला आहे. होय, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर बरसणारी कंगना आज अचानक पुन्हा एकदा करण जोहरवर बरसली. बॉलिवूड इंडस्ट्री करण जोहर वा त्याच्या वडिलांनी साकारली नाही, असे कंगना म्हणाली. कंगनाच्या या कमेंटनंतर अभिनेता व निर्माता निखील द्विवेदीसोबत तिची जुंपली. या वादाची सुरुवात समाजवादी पार्टीचे डिजिटल मीडिया को-ऑर्डिनेटर मनीष जगन अग्रवालच्या एका ट्वीटने झाली.

मनीष अग्रवालचे ट्वीट... कंगनाजी, तुम्ही सगळ्यांच्या संघर्षाला कमी लेखत, सर्वांवर टीका करत, सर्वांना लक्ष्य करत पुढे जाऊ पाहता का? करण जोहर असो वा अन्य चित्रपट निर्माता सर्व लोकांच्या एकत्रित अशा कष्टाने भारतीय चित्रपटसृष्टी उभी झाली आहे. कोणतीही इंडस्ट्रीत सर्वांना शिव्या देऊन 1-2 दिवसांत उभी होत नाही, असे ट्वीट मनीष अग्रवाल यांनी केले.मनीष अग्रवाल यांच्या या ट्वीटला उत्तर देत कंगनाने एकापाठोपाठ एक असे अनेक ट्वीट केलेत.

पहिले ट्विट ‘इंडस्ट्री केवळ करण जोहर वा त्याच्या वडिलांनी उभी केली नाही. दादासाहेब फाळकेंपासून प्रत्येक कलाकार व मजूरांनी उभी केली आहे. त्या जवानाने ज्याने सीमेचे रक्षण केले, त्या नेत्याने ज्याने राज्यघटनेचे पावित्र्य राखले, त्या नागरिकाने ज्याने तिकिट खरेदी करून प्रेक्षकांची भूमिका साकारली अशा सर्वांचे ही इंडस्ट्री उभी करण्यात योगदान आहे. ही इंडस्ट्री कोट्यवधी भारतीयांनी उभी केली आहे,’ असे कंगना पहिल्या ट्वीटमध्ये म्हणाली.

दुसरे ट्वीट

काय निर्माण केले? आयटम नंबर्सचे? बहुतांश बकवास चित्रपटांचे? ड्रग्ज कल्चरचे? देशद्रोह व दहशतवादाचे? बॉलिवूडवर जग हसते. पैसा तर दाऊदनेही कमावला. पण प्रतिष्ठा हवी असेल तर ती कमावण्यासाठी प्रयत्न करा. काळेधंदे लपवण्याचे प्रयत्न करू नका, असे दुसरे ट्विट तिने केले. यात तिचा इशारा करण जोहरकडे होता.

तिसरे ट्वीट

‘मी इंडस्ट्रीकडे आकर्षित झाले कारण जे माफिया येथील लोकांवर अत्याचार करत आहेत, त्यांची एकदिवस पोलखोल व्हावी म्हणून आणि  पोलखोल झालीच,’ असे तिस-या ट्विटमध्ये तिने म्हटले.

चौथे ट्वीट

‘ तुम्ही खरे म्हणालात, सगळे स्वत:साठीच जगतात. स्वत:साठीच जे काही करायचे ते करतात. मात्र कधीकधी आपल्यापैकी एकाला आयुष्य इतके सतावते की, तो निडर बनतो आणि त्याच्या आयुष्याचे संदर्भच बदलतात, उद्देश बदलतात. हेही घडते आणि हेही एक सत्य आहे,’ असे कंगना चौथ्या ट्वीटमध्ये म्हणाली.

शिवसेनेवरील 'त्या' ट्विटनं ट्रोल झाली कंगना; खऱ्या-खोट्यातील फरकही समजेना

तर ती मला क्लॅप बॉय बनवेल...! कंगना राणौतबद्दल बोलले विक्रम भट

टॅग्स :कंगना राणौतकरण जोहर