अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा ( Raj Kundra) याला पॉर्न फिल्म प्रकरणी अटक झाली आणि इंडस्ट्रीत खळबळ माजली. आता या प्रकरणावर कंगना राणौत (Kangana Ranaut ) बोलणार नाही, असे कसे शक्य आहे? राज कुंद्राला अटक होताच कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा कंगना भडकली आहे. (Raj Kundra arrest) इन्स्टास्टोरीवर कंगनाने तिची प्रतिक्रिया दिली. ‘हेच कारण आहे की, मी या इंडस्ट्रीला गटार म्हणते. प्रत्येक चकाकणारी वस्तू सोने नसते...,’अशी जळजळीत प्रतिक्रिया तिने दिली आहे. केवळ इतकेच नाही. माझ्या प्रॉडक्शनच्या ‘टीकू वेड्स शेरू’ या सिनेमात मी बॉलिवूडचा पर्दाफाश करणार आहे. इंडस्ट्रीला सक्षम मूल्यांवर आधारित व्यवस्था हवी आहे, असेही कंगनाने म्हटले आहे.
म्हणूनच मी या इंडस्ट्रीला गटार म्हणते...; कंगना राणौतची पुन्हा सटकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 11:09 IST
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म प्रकरणी अटक झाली आणि इंडस्ट्रीत खळबळ माजली. आता या प्रकरणावर कंगना राणौत बोलणार नाही, असे कसे शक्य आहे?
म्हणूनच मी या इंडस्ट्रीला गटार म्हणते...; कंगना राणौतची पुन्हा सटकली
ठळक मुद्दे राज कुंद्राला सोमवारी रात्री अटक झाली. कोर्टाने त्याला 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.