कंगना राणौतने हृतिक रोशनवर पुन्हा केला हल्लाबोल; म्हटले, ‘मला बघून पळून जातो!’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 20:54 IST
राजीवने कंगनाला विचारले की, जेव्हा तुम्ही एखाद्या पार्टीत एकत्र येता तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया असते? याचे उत्तर देताना कंगनाने लगेचच म्हटले की, ‘तो मला बघून पळून जातो.
कंगना राणौतने हृतिक रोशनवर पुन्हा केला हल्लाबोल; म्हटले, ‘मला बघून पळून जातो!’
काही दिवसांपूर्वी कंगना राणौत आणि हृतिक रोशनमधील वाद मधल्या काळात शांत झाला होता. असे वाटत होते की, आता दोघांमधील हे युद्ध आता संपले असावे. परंतु आता पुन्हा एकदा दोघांमधील वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण कंगना सहजासहजी माघार घेण्यास तयार नसून, ती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हृतिकवर हल्लोबोल करीत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने म्हटले होते की, ‘हृतिकला हात जोडून माफी मागायला लावेल.’ आता तिने पुन्हा एकदा हल्लाबोल करताना हृतिक मला बघून पळून जात असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वास्तविक कंगनाला रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जाते. तिच्या बोलण्यामुळे लोक काय अर्थ काढतील याचा ती कधीच विचार करीत नाही. जर कंगनाला कुठल्याही प्रश्नाचे उत्तर विचारले तर ती त्यावर खरे उत्तरच देईल. असेच काहीसे उत्तर तिने राजीव मसंदला दिलेल्या एका मुलाखतीत दिले आहे. राजीवने कंगनाला तिच्या आणि हृतिकच्या नात्यावर आणि ब्रेकअप विचारले असता, तिने बेधडकपणे हा खुलासा केला आहे. त्यामुळे आगामी काळात हृतिकला एखाद्या भयंकर अडचणीचा सामना करावा लागेल असेच काहीसे दिसत आहे. राजीवने कंगनाला विचारले की, जेव्हा तुम्ही एखाद्या पार्टीत एकत्र येता तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया असते? याचे उत्तर देताना कंगनाने लगेचच म्हटले की, ‘तो मला बघून पळून जातो. २०१४ मध्ये आमचे ब्रेकअप झाल्यानंतर बरोबर एक वर्षाने हृतिकने मला त्रास देण्यास सुरुवात केली. मी हृतिकच्या वडिलांकडे ‘तुमचा मुलगा मला त्रास देत आहे’ असे सांगितले होते. त्यावेळी त्याच्या वडिलांनी मला दोघांची एक मिटिंग घेऊन या प्रकरणावर कायमचा पडदा टाकणार असल्याचे सांगितले. तेव्हापासून अजूनपर्यंत मी त्या मिटिंगच्या प्रतीक्षेत आहे. पुढे बोलताना कंगनाने म्हटले की, ‘मला हृतिकशी बोलायचे आहे. मला त्याला विचारायचे आहे की, का बरं तो जगभर म्हणत फिरत आहे की मला तो ओळखत नाही? अखेर तो खरं का लपवित आहे. तो या विषयावर चर्चादेखील करू इच्छित नाही.’ कंगनाने राजीव हेदेखील म्हटले की, ‘तू तुझ्या शोमध्ये हृतिकला बोलाव आणि या विषयावर चर्चा घडवून आण’ पुढे बोलताना कंगना अशीही म्हणाली की, माझ्यासोबत चित्रपट केल्यानंतरही तो असे म्हणूच कसा शकतो की, तो मला ओळखत नाही?’यावेळी कंगनाने असेही म्हटले की, ‘जर हृतिकला त्याच्या परिवाराची, इमेजची आणि मुलांची एवढी चिंता आहे तर त्याने अफेअर करायचेच कशाला?’ यावेळी कंगनाने हृतिकशी संबंधित प्रत्येक प्रश्नांचे बिनधास्तपणे उत्तरे दिली. त्यामुळे आगामी काळात हृतिक मीडियाचा कसा सामना करणार हे बघणे मजेशीर ठरणार आहे. कारण त्याला कंगनावरून प्रश्न विचारल्यास तो त्याचा कसा सामना करू शकेल? हे येत्या काळात स्पष्ट होईलच.