कंगना रानौतचा रंगून लूक ‘सुंदर हंटरवाली...’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 19:36 IST
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतचा आगामी चित्रपट ‘रंगून’ लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’मध्ये कंगना राणौतची मुख्य ...
कंगना रानौतचा रंगून लूक ‘सुंदर हंटरवाली...’
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतचा आगामी चित्रपट ‘रंगून’ लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’मध्ये कंगना राणौतची मुख्य भूमिका असून, सैफ अली खान व शाहिद कपूर यांच्याही भूमिका आहेत. मात्र यात कंगनाची भूमिका कशी असेल याबद्दल चांगलीच उत्सुकता लागली आहे. यात कंगना पोस्टर गर्लच्या रूपात दिसणार असल्याचे सांगण्यात येते. ‘रंगून’ची कथा १९४० च्या दशकातील असून, या चित्रपटाला द्वितीय महायुद्धाची पार्श्वभूमी देण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये कंगना एका अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटासाठी कंगनाने ‘फिअरलेस नादिया’पासून प्रेरणा घेतली आहे. या चित्रपटाचे काही फोटो समोर आले असून, ती ‘हंटरवाली’ प्रमाणे दिसत आहे. मागील वर्षी कंगनाला एका स्टुडिओमध्ये मर्लिन मन्रोप्रमाणे हेअरकट व जवळपास तिच्यासारख्याचा लूकमध्ये दिसली होती. या चित्रपटात ती ज्युलिया ही भूमिका साकारत आहे. ४० च्या दशकात ज्युलिया हे चर्चित नाव होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्युलिया हिला फिअरलेस नादियाशी जोडता येणार नाही. ती ४० च्या दशकातील सर्वाधिक ग्लॅमरस नाव आहे. जी थिअटरच्या माध्यमातून चित्रपटांच्या दुनियेत आपले स्थान निर्माण करते. याच दरम्यान एका करारानुसार तिला द्वितीय महायुद्धात लढणाºया सैनिकांचे मनोरजंन करावे लागते. तिचे आपल्या प्रोेड्युसर (सैफ अली खान) याच्याशी संबध असतात. मात्र सैनिकांचे मनोरंजन करताना ती एका सैनिकावर (शाहिद कपूर) प्रेम करू लागते. या चित्रपटात धैर्य, ग्लॅमर व रोमांस सोबतच युद्धाचे प्रसंग पाहता येणार आहेत. कंगनाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांची प्रशंसा करीत त्यांची काम करण्याची पद्धत अद्वितीय आहेत. ते चांगले दिग्दर्शक, लेखक व व्यक्ती असल्याचे सांगितले होते. मी साकारत असलेली ज्युलिया सुंदर, फनी व भावनिक आहे असेही ती म्हणाली होती.