Join us  

अनंत अंबानीचं कौतुक करायच्या नादात कंगनानं स्वतःच्याच पायावर मारली कुऱ्हाड; युजर्सनी आरसा दाखवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 3:16 PM

या प्री-वेडिंग फंक्शनपूर्वी, अंबानी कुटुंबाने जामनगरमधील स्थानिकांना जेवण दिले होते. दरम्यान, अनंत अंबानींचा एक व्हिडिओ समोर आला होता, यावर कंगना राणौतने त्याचे खूप कौतुक केले होते.

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग फंक्शन्स आजपासून सुरू होत आहेत. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनला हजेरी लावण्यासाठी स्टार्स मंडळी जामनगरला पोहोचले आहेत.

या प्री-वेडिंग फंक्शनपूर्वी, अंबानी कुटुंबाने जामनगरमधील स्थानिकांना जेवण दिले होते. दरम्यान, अनंत अंबानींचा एक व्हिडिओ समोर आला होता, यावर कंगना राणौतने त्याचे खूप कौतुक केले होते. कंगनाने अनंत अंबानींचे जे कौतुक केले, ते लोकांना अत्यंत आवडले. मात्र यादरम्यान कंगनाने एक चूक केली, ज्यामुळे ती ट्रोल होत आहे.

काय लिहिलं होतं कंगनानं? -काही दिवसांपूर्वी अनंत अंबानींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, यात त्यांनी त्यांची मोठी बहीण ईशा अंबानीसोबतच्या बॉन्डिंगसंदर्भात भाष्य केले होते. या व्हिडिओमध्ये त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट 'वंतारा'संदर्भात बोलताना त्याने म्हटले होते की, त्याचा मोठा भाऊ आकाश त्याच्यासाठी 'रामा'प्रमाणे आहे तर वहिणी श्लोका मेहता माता 'सीते'प्रमाणे आहे.

हा व्हिडिओ कंगनाने आपल्या एक्स अकाउंट (Twitter)वर शेअर करत, "अनंत अंबानी आपल्या संस्कृतीशी आणि मुळांशी जोडलेला आहे आणि तो खूपच समजदार आहे. तो बॉलीवूड माफियांच्या ड्रगीस्ट गँगसोबतही फिरत नाही. त्याला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा."

यामुळे कंनावर भडकले युजर्स -कंगना रणौतने अनंत अंबानीबद्दल जे लिहिले ते लोकांना आवडले, मात्र, युजर्सना तिने तिच्या ट्विटमध्ये बॉलीवूड स्टार्सना ओढलेले त्यांना खटकले आहे. राग व्यक्त करताना एका यूजरने लिहिले आहे, "सर्व ठिकाणी बॉलिवुड? आपल्याला आपल्या जुन्या क्लिप दाखवायच्या आहेत, पण आम्ही असे करणार नाही. इमर्जन्सीची वाट पाहत आहोत."

आणखी एका यूजरने लिहिले, "आपल्याला कसे माहीत की, तो बॉलीवूडच्या लोकांसोबत हँग आउट होत नाही". आणखी एकाने लिहिले, "रणबीर कपूर त्याचा चांगला मित्र आहे." आणखी एकाने लिहिले, "आपण म्हणत आहात की, तो आपल्यासारख्या लोकांसोबत फिरत नाही."

टॅग्स :कंगना राणौतमुकेश अंबानीबॉलिवूडसोशल मीडिया