Join us  

कंगनाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, स्वत:च्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड अन् झाली ट्रोल....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 2:02 PM

अशात तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या व्हिडीओत कंगना स्वत:च तोंडावर पडल्याचे दिसून येते.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेतर राहणारी अभिनेत्री कंगना रणौतला शेतकरी आंदोलनातील महिलेबाबत अपशब्द वापरणं आणि त्यानंतर दिलजीत दोसांजसोबत पंगा घेणं चांगलंच महागात पडल्याचं दिसत आहे. कंगनाला सोशल मीडियावर ट्रोलचा सामना करावा लागत आहे. कंगनाची पहिल्यांदाच इतकी खिल्ली उडवली जात आहे. 

अशात तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या व्हिडीओत कंगना स्वत:च तोंडावर पडल्याचे दिसून येते. हा व्हिडीओ द कपिल शर्मा शोमधील आहे. यावेळी ती 'रंगून' सिनेमाच्या प्रमोशनसाठी तिथे गेली होती. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा कंगनाला प्रश्न विचारताना दिसत आहे. शो दरम्यान कपिल कंगनाला प्रश्न विचारतो की, तुम्ही सोशल मीडिया का वापरत नाही?

कपिलच्या या प्रश्नावर उत्तर देताना कंगना कपिलला म्हणते की, 'मला असं वाटते की सोशल मीडियावर रिकामे लोक जास्त आहेत. या लोकांना काहीच कामे नसतात. कारण ज्या लोकांना काम असतं त्यांना सोशल मीडियासाठी वेळच नसतो'.

कंगनाचा हा जुना व्हिडिओ शेअर करत लोक कंगनाला आठवण करून देत आहेत की, आता तू त्याच लोकांच्यात सामिल झाली आहेस ज्या लोकांना काही काम नसतं. कंगनाचा हा जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

टॅग्स :कंगना राणौतसोशल व्हायरलसोशल मीडियाबॉलिवूड