Join us  

"धीरेंद्र शास्त्रींना पाहून मिठी मारावीशी वाटली, पण...", कंगना रणौतचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 12:44 PM

कंगनाने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत इन्स्टावर पोस्ट केली आहे.

अयोध्येत पार पडणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे. या सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटीही अयोध्येत पोहोचले आहेत. बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतही राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांना या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्रीही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. 

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेसाठी अयोध्येत गेलेली कंगना अनेक साधू संतांच्या भेटी घेत आहे. अयोध्येत कंगनाने बागेश्वर बाबा यांचीही भेट घेतली. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कंगनाने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत इन्स्टावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये कंगना म्हणते, "पहिल्यांदाच माझ्यापेक्षा वयाने छोट्या असलेल्या गुरुजींची भेट झाली. माझ्यापेक्षा ते जवळपास १० वर्षांनी लहान आहेत. त्यांना पाहून वाटलं की छोट्या भावाप्रमाणे त्यांना मिठी मारू. पण, नंतर लक्षात आलं की कोणीही वयामुळे गुरू होत नाही. तर त्यांच्या कर्मामुळे होतो. गुरुजींचे चरणस्पर्श केले आणि आशीर्वाद घेतला. जय बजरंगबली." 

दरम्यान, अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संपू्र्ण देशभर या सोहळ्याची लगबग सुरू होती. आज अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपणार आहे. रामललाच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्यानगरी सजली आहे. 

टॅग्स :कंगना राणौतबागेश्वर धामराम मंदिर