Join us  

प्रशांत भूषण यांनी कंगना रनौतच्या क्षमतेवर उपस्थित केला सवाल; अ‍ॅक्‍ट्रेसनेही त्याच स्‍टाइलमध्ये केला 'धाकड' पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 9:56 PM

प्रशांत भूषण यांनी एक व्हिडिओ शेअर करत कंगनावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे, तो एडिटेड आहे.

नवी दिल्ली - बॉलिवुड अ‍ॅक्‍ट्रेस कंगना रनौत (Kangana Ranaut) सिनेमांतील दमदार अ‍ॅक्‍टिंग बरोबरच आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठीही ओळखली जाते. एवढेच नाही, तर भारतात क्वचितच अशी एखादी अ‍ॅक्ट्रेस असेल, जी तिच्या एवढी सोशल मिडियावर अ‍ॅक्‍टिव्ह असेल. तिने नुकतेच प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांनाही ट्विटरवर उत्तर दिले आहे. प्रशांत भूषण यांनी एक व्हिडिओ शेअर करत कंगनावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता. (Kangana Ranaut reply to Prashant Bhushan)

प्रशांत भूषण यांनी 'मणिकर्णिका' चित्रपटाच्या शूटिंग सेटचा एक व्हिडिओ शेअर केला. यात एक युद्धाचा प्रसंग शूट केला जात आहे. त्यात कंगना खोट्या घोड्यावर बसलेली दिसते. यापूर्वीही हा व्हिडिओ अनेकांनी शेअर करून कंगनाची खिल्ली उडवली आहे.

रिहानानं विचारलं शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही? कंगना भडकली; म्हणाली - 'क्योंकि वो...!'

प्रशांत भूषण यांनी शेअर केला एडिटेड व्हिडिओ -आता प्रशांत भूषण यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे, तो एडिटेड आहे. त्याच्या बॅकग्राउंडला 'लकडी की काठी, काठी पे घोडा' हे गाणे ऐकायला येते. तसेच त्यांनी या व्हिडिओला 'झांसी की रानी!' असे कॅप्शनही दिले आहे.

कंगनानेही व्हिडिओ शेअर करत केला पलटवार - प्रशान भूषण यांना उत्तर देत, कंगनानेही एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती खऱ्या घोड्यावर राइड करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला 'दंगल' चित्रपटातील प्रसिद्ध गाणे 'ऐसी धाकड है' ऐकायला मिळत आहे.

कंगना राणौतने शेअर केले 'धाकड'मधील अ‍ॅक्शन सीन, चित्रीकरणासाठी खर्च केले २५ कोटी

"मी बढाई मारत नाही"या व्हिडिओला कंगनाने कॅप्शन दिले आहे, 'हे खरे आहे, की अ‍ॅक्‍शन सीक्‍वेसेस चित्रित करण्यासाठी अनेक ट्रिक्‍स वापरल्या जातात. मात्र, आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करत असाल, की मी लक्ष्‍मी बाई यांची भूमिका साकारताना हॉर्स राइडिंग करू शकत नाही, तर मी ते स्वीकार करणार नाही. पाहा, आता आपण म्हणाल, की मी बढाई मारत आहे, मात्र हे सत्य आहे, मी खूप चांगली राइड करू शकते.' 

टॅग्स :कंगना राणौतट्विटरमाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी