Join us  

कंगना राणौत पुन्हा बरळली, गांधींजींना ‘चूक’ अन् ब्रिटनच्या महाराणीला ‘महान’ म्हणाली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 3:57 PM

 लोकांनी घेतला क्लास; म्हणाले, लौट जा पीपल के पेड पर

ठळक मुद्देया ट्वीट्सनंतर कंगनाला अनेकांनी वाईट पद्धतीने ट्रोल केले. अनेकांनी तिला आपल्या कामाशी काम ठेवण्याचा सल्ला दिला.

कंगना राणौत पुन्हा बरळली. पण यावेळी लोकांनी तिचा चांगलाच क्लास घेतला. शुक्रवारी कंगनाने ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीय आणि शाही कुटुंबात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ट्वीट केले. प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन यांनी शाही कुटुंबावर वंशद्वेषाचे आरोप केल्यानंतर कंगनाने ब्रिटनच्या महाराणीची बाजू घेत, ट्वीट केले. शिवाय याच अनुषंगाने एका युजरला उत्तर देताना तिने महात्मा गांधींचा उल्लेख केला. महात्मा गांधी एक वाईट पिता होते. त्यांनी अनेकदा आपल्या पत्नीला घराबाहेर काढले. मात्र केवळ पुरूष असल्याने जगाने त्यांना माफ केल्याचे ती म्हणाली.

मी अशा मुलाखती पाहत नाही...

शुक्रवारी दुपारी कंगनाने दोन ट्वीट्स केलेत. शाही घराण्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ती म्हणाली, ‘गेल्या काही दिवसांत लोकांनी एका कुटुंबाची एकतर्फी कहाणी ऐकून खूप गॉसिप्स केले, खूप जज केले, आॅनलाईन चिखलफेक केली. मी ती मुलाखत पाहिली नाही. कारण सासू,सूना आणि कटकारस्थानासारख्या गोष्टी मला आवडत नाहीत,’ असे तिने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले. तुम्हाला ठाऊक असेलच की ब्रिटनच्या घराण्याची सून मेगन मार्कल हिने नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने ब्रिटनच्या राजघराण्याबद्दल अनेक खळबळजनक खुलासे केले होते.

क्वीनचे कौतुक

अन्य एका ट्वीमध्ये कंगनाने ब्रिटनच्या क्वीनचे तोंडभरून कौतुक केले. ‘संपूर्ण जगात ती एकमेव शासक आहे. कदाचित ती एक आदर्श पत्नी, बहीण नसेलही पण ती एक महान राणी आहे. तिने आपल्या वडिलांचे स्वप्न पुढे नेले, एखाद्या मुलापेक्षाही शाही मुकूटाचा मान राखला. आयुष्यातील प्रत्येक भूमिका आपण आदर्श पद्धतीने साकारू शकत नाही. त्या राणीने मुकूट वाचवला, तिला राणी म्हणूनच संन्यास घेऊ द्या,’ असे तिने लिहिले..

गांधींजी पुरूष होते म्हणून....

कंगनाच्या या ट्वीटवर एका युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना कंगनाने गांधीजींचा उल्लेख केला. ‘महात्मा गांधींवर त्यांच्याच स्वत:च्या मुलांनी वाईट पिता असल्याचा आरोप केला होता. पत्नीने घरातील शौचालय स्वच्छ करण्यास नकार दिल्यावर त्यांनी तिला घराबाहेर काढल्याचे अनेक उल्लेख आहेत. ते एक महान नेते होते, जे एक महान पती बनू शकले नाहीत. पण जगाने त्यांना माफ केले, कारण ते पुरूष होते,’ असे तिने लिहिले.

झाली ट्रोलया ट्वीट्सनंतर कंगनाला अनेकांनी वाईट पद्धतीने ट्रोल केले. अनेकांनी तिला आपल्या कामाशी काम ठेवण्याचा सल्ला दिला. इंग्रजांबद्दल तुला इतका पुळका का? असा सवाल एका युजरने तिला केला. लौट जा चुडैल, लौट जा उसी पुराने पीपल के पेड पर, असे एका युजरने तिला सुनावले.

 

टॅग्स :कंगना राणौतमेगन मार्केल