Join us  

"जाणूनबुजून असं करतात.."ऑस्कर अन् ग्रॅमीला लता मंगेशकरांचा विसर पडल्यानं कंगना रनौत भडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 5:17 PM

कंगना राणौतने पोस्ट शेअर करत ग्रॅमी पुरस्कारांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

अलीकडेच अमेरिकेतील लास वेगास येथे नॅशनल अकादमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्सेस येथे 64 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आलीकडेच करण्यात आले होते.  या सोहळ्यात संगीत क्षेत्रातमधील अनेक कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. भारतातील प्रसिद्ध संगीतकार रिकी केज आणि फाल्गुनी शाह यांना देखील ग्रॅमी पुरस्कार पटकवला आहे.  या कार्यक्रमात अनेक गायकांना श्रद्धांजली वाहण्यात आली पण भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही. यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर या पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांना ट्रोल केले. अभिनेत्री कंगना राणौत चांगलीच भडकली आणि तिने पुरस्कार म्हणून बहिष्कार टाकण्याची मागणी केली.

कंगना रणौतने इंस्टा स्टोरीवर लिहिले की, ''आपल्याला कोणत्याही स्थानिक पुरस्कारांबाबत ठामपणे आक्षेप घेता आला पाहिजे. . हे पुरस्कार आंतरराष्ट्रीय असण्याचा दावा करतात पण दिग्गज लोकांना हे विसरतात. वर्णभेद किंवा विचारसरणीमुळे जाणूनबुजून दुर्लक्षित करतात. ऑस्कर आणि ग्रॅमी या दोन्ही पुरस्कारांना लता मंगेशकर यांचा विसर पडला. 'असे कंगना म्हणाली.

 कंगना नेहमी तिच्या बिनधास्त आणि बेधड वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. कंगना सध्या ‘लॉकअप’ (Lock Upp) हा शो होस्ट करतेय आणि या शोनं 200 मिलियन व्ह्युजचा आकडा पार केला आहे. लवकरच तिचा धाकड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

टॅग्स :कंगना राणौतग्रॅमी पुरस्कारलता मंगेशकर