Join us  

ब्रालेटनंतर कंगनाने शेअर केले स्वीमसूट अवतारातील फोटो, भाच्यासोबत असे केले एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 11:25 AM

नुकतेच कंगनाने ब्रालेटमधील सुपर बोल्ड फोटो शेअर केले होते. यावरून ती चांगलीच ट्रोल झाली होती. 

ठळक मुद्देट्रोल झाल्यानंतर गप्प बसेल ती कंगना कुठली? तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले होते.

कंगना राणौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर किती अ‍ॅक्टिव्ह असते, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सध्या चर्चा आहे या बॉलिवूड क्वीनच्या सुपर ग्लॅमरस फोटोंची. होय, नुकतेच कंगनाने ब्रालेटमधील सुपर बोल्ड फोटो शेअर केले होते. यावरून ती चांगलीच ट्रोल झाली होती. लोकांना संस्कृती, सभ्यतेचे धडे देतेय, आता हे काय? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशा काय काय प्रतिक्रिया तिच्या या फोटोंवर उमटल्या होत्या. आता कंगनाने पुन्हा एकदा स्वीमसूटमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत कंगना तिच्या भाच्यासोबत वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करतेय.

बुडापेस्टच्या एका वॉटर पार्कमधील या फोटोत कंगना भाचा पृथ्वीसोबत खेळताना दिसतेय.‘माझ्या मुलासोबत वॉटर पार्कमध्ये एक दिवस. मी पाण्यापासून दूर राहते पण त्याचे पाण्यावर प्रेम आहे. मी खूप आनंदी आहे, कारण तो खूप आनंदी होता. कदाचित यालाच प्रेम म्हणतात,’ असे कंगनाने हे फोटो शेअर करताना लिहिले.

झाली होती ट्रोलकंगनाने स्वत:चे सुपर ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर केलेले पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले होते. विदेशात गेल्यावर भारतीय संस्कृती विसरलीस का? देशात आल्यानंतर  धर्म,सभ्यता, रीति रिवाज यांच्यावर तू सर्वांना ज्ञान देणार का गं ताई? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती कंगना, तू खूपच अश्लील कपडे घातले आहेस..अशा शब्दांत अनेकांनी तिला ट्रोल केले होते.

कंगनाने दिले प्रत्युत्तरट्रोल झाल्यानंतर गप्प बसेल ती कंगना कुठली? तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले होते. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर प्राचीन काळातील एका युवतीचा फोटो पोस्ट केला होता. ‘ जे लोक मला सनातन धर्माबद्दल ज्ञान देत आहेत त्यांनी कृपया लक्षात घ्या, तुम्ही अब्राहमिक सारखे वागत आहात’, असे ती म्हणाली होती. 

टॅग्स :कंगना राणौत