Join us

​दीपिकासोबत डेटवर जाण्यासाठी कंगनाला किडनॅपचा प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 17:20 IST

बॉलिवूडमधील दोन आघाडीच्या अभिनेत्री कंगना राणौत आणि दीपिका पादुकोण यांच्यात सतत कॅटफाईट होत असते. त्यांच्यातील भांडण मिटवण्यासाठी इरफान खानकडे ...

बॉलिवूडमधील दोन आघाडीच्या अभिनेत्री कंगना राणौत आणि दीपिका पादुकोण यांच्यात सतत कॅटफाईट होत असते. त्यांच्यातील भांडण मिटवण्यासाठी इरफान खानकडे एक भन्नाट प्लॅन आहे. इरफानला दीपिकासोबत डेटींग करायचे आहे आणि कंगनाला किडनॅप करायचे आहे. एका टीव्ही चॅनलवर दिलेल्या गंमतीशीर मुलाखतीत हा प्लॅन इरफानने सांगितला.दोन अभिनेत्रींमध्ये विस्तव जात नाही. या दोघींपैकी कुणाला किडनॅप करायला आणि कुणासोबत डेटवर जायाला आवडेल असा प्रश्न इरफानला विचारण्यात आला होता. यावर इरफान म्हणाला, '' मी कंगनाला किडनॅप करेन आणि माझ्या आवडीच्या चित्रपटात तिला भूमिका करायला लावेन. मला दीपिकासोबत डेट करायला आवडेल आणि दोघींच्यासोबतही काम करायला आवडेल.''आता या इरफानच्या प्लॅनवर कंगना आणि दीपिका काय उत्तर देतात ते पाहूयात. इरफानचा 'मदारी' हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला होता. कंगना आणि इरफान रितेश बात्राच्या आगामी चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. 'झांसी की राणी' या चित्रपटाचे शूटींग संपल्यानंतर कंगना या चित्रपटात काम करेल.