कंगना खूश्श!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2016 22:27 IST
‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’साठी ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरणारी अभिनेत्री कंगना रानोट जाम खुश आहे. गत आठवड्यातच ...
कंगना खूश्श!!
‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’साठी ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरणारी अभिनेत्री कंगना रानोट जाम खुश आहे. गत आठवड्यातच कंगनाने आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. याच आनंदात राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची भर पडल्याने कंगनाचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. हे माझ्यासाठी आत्तापर्यंतची वाढदिवसाला मिळालेली सर्वात मोठी भेट आहे. महानायक अभिताभ बच्चन यां यांच्यासोबत मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळणे, माझ्यासाठी आणखी आनंदाची बाब आहे, अशी कंगना म्हणाली.