बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप सतत सोशल मीडियावर ट्रोल होत असतो, अगदी तो ट्रोलर्सचा सर्वात आवडता आहे, असे म्हटले तरी चालेल. अनुरागच्या प्रत्येक ट्विटवर लोक कमेंट्स करतात, यापैकी बहुतांश ट्विटवरून तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतो. दुसरीकडे केआरके अर्थात कमाल आर खान याच्या प्रत्येक ट्विटनंतर सोशल मीडियावर जणू भूकंप येतो. केआरकेने पुन्हा एकदा असेच काही केले आहे. केआरकेने काय करावे तर चक्क आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर केआर दिग्दर्शक अनुराग कश्यपला श्रद्धांजली वाहिली.
अनुरागने केला पलटवार
केआरकेचे हे ट्विट पाहून अनुरागला कदाचित राहावले नाही. त्याने केआरकेला अनोख्या शब्दांत उत्तर दिले.‘काल यमराजांचे दर्शन झाले़, आज यमराज स्वत: घरी सोडून गेलेत. म्हणाले, आता तर तुला आणखी बरेच सिनेमे बनवायचे आहेत. तू चित्रपट बनवणार नाहीस तर मूर्ख/ भक्त त्याच्यावर बहिष्कार टाकणार नाहीत आणि त्यांचे आयुष्य सार्थक होणार नाही. त्यांच्या आयुष्य सार्थकी लागावे म्हणून यमराज मला परत सोडून गेलेत,’ अशा शब्दांत अनुरागने केआरकेची बोलती बंद केली.
अनुरागच्या ट्विटवर चाहत्यांच्या कमेंट
म्हणे, चूक झाली
अनुरागच्या या ट्विटनंतर केआरकेने आणखी एक ट्विट करत, हे सगळे स्टाफमधील एका व्यक्तिच्या चुकीने घडल्याचे सांगत सारवासारव केली. ‘मला दु:ख वाटतेय की माझ्या स्टाफमधील एका व्यक्तिने अनुराग कपूरला अनुराग कश्यप समजून चुकीची बातमी प्रसिद्ध केली. तुमच्या आत्म्याला शांती मिळो अनुराग कपूरजी़’, असे केआरकेने लिहिले.अर्थात यावर मात्र अनुराग कश्यपने कुठलेही उत्तर दिले नाही.
या नवीन कंगनाला मी ओळखत नाही...! अनुराग कश्यपच्या ट्वीटने भडकली कंगना राणौत, म्हटले ‘मिनी महेश भट’
प्रेमासाठी काय पण...! गर्लफ्रेन्डला थँक्यू म्हणण्यासाठी अनुराग कश्यपने अख्खा सिनेमा बनवला!