Join us

कमल हसनला डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 13:25 IST

तामिळ चित्रपटाचे सुपरस्टार कमल हसनला शुक्रवार (दि.५) रुग्णालयालयातून डिस्चार्ज मिळाले.१४ जुलैला ते आपल्या कार्यालयाच्या पायरीवरुन पडून जखमी झाले होते. ...

तामिळ चित्रपटाचे सुपरस्टार कमल हसनला शुक्रवार (दि.५) रुग्णालयालयातून डिस्चार्ज मिळाले.१४ जुलैला ते आपल्या कार्यालयाच्या पायरीवरुन पडून जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. यामध्ये त्यांच्या उजव्या पायाचे हाड तुटल्याने, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.  अजूनही त्यांची जखम ही पूर्णपणे बरी झालेली नसून, त्याना चालण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे.संपूर्ण जखम ठिक होण्यासाठी डॉक्टारांनी त्यांना आराम करण्याचे सांगितले आहे. एक ा खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. यामुळे त्यांचा आगामी ‘शाबास नायडू’ चित्रपटाची शुटींग पुढे ढकलण्यात आली आहे. शाबास नायडूची शुटींग आता सप्टेंबर महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारामुळे हा चित्रपट प्रदर्शित होणेही लांबणीवरही पडू शकतो. याअगोदर हा चित्रपट डिसेंबरमध्ये ेप्रदर्शित करण्याचे जाहीर करण्यात आले होते. विशेष म्हणजे कमल हे या चित्रपटात आपली मुलगी श्रुति हासन सोबत दिसणार आहेत.