Join us
Daily Top 2Weekly Top 5

 प्रेक्षक तुलाही धडा शिकवतील...! रिया चक्रवर्तीला पाठींबा देणा-या आयुष्यमान खुराणावर बरसला केआरके

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 15:30 IST

सुशांत आयुष्यमानचा प्रतिस्पर्धी होता. म्हणून त्याने रियाची पाठराखण केली, असा आरोप करत केआरकेने आयुष्यमानवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देसुशांतच्या बँक खात्यातून रियाने १५ कोटी रुपये दुस-या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.  

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचा गुंता दिवसेंदिवस वाढत असताना रिया चक्रवर्तीच्या अडचणीही वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून रिया सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतेय. आता तर रियाला सपोर्ट करणारेही ट्रोल होत आहेत. अभिनेता आयुष्यमान खुराणा त्यापैकीच एक़ आयुष्यमानने रियाला पाठींबा दिल्याने तूर्तास केआरके अर्थात कमाल आर खान जाम संतापला आहे. सुशांत आयुष्यमानचा प्रतिस्पर्धी होता. म्हणून त्याने रियाची पाठराखण केली, असा आरोप करत केआरकेने आयुष्यमानवर निशाणा साधला आहे.

तर आयुष्यमानने रियाच्या एका पोस्टवर कमेंट केली होती. यानंतर ट्रोलर्सने आयुष्यमानला धारेवर धरले होते. आता केआरकेने आयुष्यमानवर टीका केली आहे. आयुष्यमानने रिया व नेपो किड्सला पाठींबा देण्यामागे तीन कारणं असल्याचे त्याने म्हटले.आपल्या ट्विटमध्ये केआरकेने लिहिले, ‘आयुषमानने रिया चक्रवर्ती आणि नेपो किड्सला पाठिंबा देण्यामागे तीन कारणं आहेत. एक म्हणजे त्याला बॉलिवूडमध्ये टिकून राहायचे आहे. दुसरे तो यशराज फिल्म कंपनीसोबत काम करतोय. तिसरे म्हणजे, सुशांत त्याचा प्रतिस्पर्धी होता. पण चिंता करुन नकोस खुराणा. तुझे नवे चित्रपट येणार आहेत. तुलाही प्रेक्षक चांगलाच धडा शिकवतील. आॅल द बेस्ट.’

केआरकेचे हे ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. आयुष्यमानने अद्याप त्यावर उत्तर दिलेले नाही. तो काय उत्तर देतो ते बघूच.दरम्यान सुशांतच्या बँक खात्यातून रियाने १५ कोटी रुपये दुस-या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.  

रिया आणि शौविक यांनी काही कंपन्या स्थापन केल्या आहेत. मात्र, या कंपन्यांचा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. या कंपन्या मनी लॉन्ड्रिंगसाठी स्थापन करण्यात आल्या होत्या का? या कंपन्यांचे रजिस्ट्रेशन होते का? असे सवाल ईडीकडून उपस्थित करण्यात आले आहेत.

टॅग्स :रिया चक्रवर्तीआयुषमान खुराणाकमाल आर खान