काजोलने केली ‘शिवाय’ च्या ट्रेलरची स्तुती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 11:21 IST
अजय देवगनच्या ‘शिवाय’ चित्रपटाच्या ट्रेलरचे त्याची पती काजोलने खूप स्तुती केली आहे. इंदोरमध्ये एका भव्य समारंभात या चित्रपटाचे ट्रेलर ...
काजोलने केली ‘शिवाय’ च्या ट्रेलरची स्तुती
अजय देवगनच्या ‘शिवाय’ चित्रपटाच्या ट्रेलरचे त्याची पती काजोलने खूप स्तुती केली आहे. इंदोरमध्ये एका भव्य समारंभात या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च करण्यात आले. यावर अजय देवगनला या ट्रेलरनंतर खूप चांगले फिडबॅक येत आहेत. परंतु, अजय हा पत्नी काजोलने दिलेल्या फिडबॅकमुळे खूप आनंदीत आहे. काजोलने ट्विटरवर सर्वांना हा ट्रेलर पाहण्याची विनंती केली आहे. सोबत ‘में रूद्र , घरो में शंकर’ असे लिहीले आहे. अजयने तिला लिहीले आहे की, मी तुला सोशल मिडीयावर धन्यवाद देऊ की, घरी आल्यानंतर. यावरुन हे दोघे पती - पत्नी एकमेकांना किती सहकार्य करतात हे दिसून येते. अजय देवगनने दिग्दर्शन केलेला ‘शिवाय’ हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होत आहे.