काजोलने आपल्या लाडक्या युगला अशा अंदाजात केले बर्थ डे विश, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 22:10 IST
अभिनेत्री काजोल हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून, तिचा हा फोटो चाहत्यांमध्ये भलताच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये काजोलसोबत ...
काजोलने आपल्या लाडक्या युगला अशा अंदाजात केले बर्थ डे विश, पहा फोटो!
अभिनेत्री काजोल हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून, तिचा हा फोटो चाहत्यांमध्ये भलताच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये काजोलसोबत तिचा चिमुकला युग देवगण बघावयास मिळत आहे. वास्तविक काजोल या फोटोच्या माध्यमातून आपल्या मुलाला बर्थ डे विश करीत आहे. काजोलने हा फोटो स्वत:च तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केला असून, त्यास चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यावेळी काजोलने फोटोला कॅप्शनही दिले असून, त्यामध्ये तिने लिहिले की, Happy birthday milk moustache...काजोलने हा फोटो शेअर करताच त्यास तिच्या चाहत्यांकडून लाखोंच्या संख्येने लाइक्स मिळाले. फोटोमध्ये काजोल आणि तिचा लाडका युग खूपच सुंदर दिसत आहेत. काजोलने आपल्या लाडक्याला ज्या पद्धतीने विश केले, ती पद्धत तिच्या चाहत्यांना चांगलीच भावल्याचे दिसत आहे. कारण अजूनही दोघा मायलेकांच्या या फोटो चाहत्यांकडून लाइक्स आणि कॉमेण्ट मिळत आहेत. शिवाय काजोलच्या या कॉमेण्टवरून ही गोष्टदेखील स्पष्ट होते की, तिचा लाडका लेक खूपच गुणी असावा. शिवाय त्याचा संपूर्ण दिवस खोडकरपणा करण्यात जात असावा, असाही अंदाज काढला तर चुकीचा ठरू नये. काजोल आणि अजयला एक मुलगा एक मुलगी आहे. मोठ्या मुलीचे नाव नायसा आहे तर लहानग्याचे नाव युग आहे. १९९९ मध्ये बॉलिवूडचे हे कपल विवाहाच्या बंधनात अडकले. नायसा आता १३ वर्षांची असून, शिक्षणासाठी विदेशात आहे. काजल नेहमीच आपल्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. यावेळी तिने शेअर केलेल्या या फोटोत युग खूपच सुंदर दिसत आहे. दरम्यान, अजयच्या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘बादशाहो’ हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली.