Join us  

या बॉलिवूड अभिनेत्यावर होता काजोलचा क्रश, प्रीमिअरला गेली अन् पूर्णवेळ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 5:13 PM

काजोल कधी यावर बोलली नाही. पण काजोलचा जवळचा मित्र करण जोहरने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये याचा खुलासा केला होता.

ठळक मुद्देअजय देवगण व काजोल यांची पहिली भेट 1995 साली झाली होती.

सर्वांची आवडती अभिनेत्री काजोलने अजय देवगणसोबत लग्न केले आणि आयुष्यात स्थिरावली. पण हीच चुलबुली काजोल ऐन तारूण्यात कुणाच्या प्रेमात होती माहितीये? करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत एका बॉलिवूड अभिनेत्यावर तिचा क्रश होता. काजोल कधी यावर बोलली नाही. पण काजोलचा जवळचा मित्र करण जोहरने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये याचा खुलासा केला होता.

काजोलचा क्रश दुसरा कोणी नव्हता तर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार होता. होय, करणने हा खुलासा करत, एक मजेदार किस्साही शेअर केला होता.तर हा किस्सा आहे 1991 सालचा. ऋषी कपूरच्या एका चित्रपटाच्या प्रीमिअरला काजोल हजर होती आणि या इव्हेंटमध्ये पूर्णवेळ तिच्या क्रशला शोधत होती. या इव्हेंटमध्ये अक्षय कुमार तर काजोलला भेटला नाही. पण काजोलसोबत इव्हेंटमध्ये हजर असलेला करण हा मित्र मात्र तिला भेटला. यानंतर काजोल व करण दोघेही खूप चांगले मित्र बनले.

पुढे आपल्या याच क्रशसोबत काजोलने एक सिनेमाही केला. ‘ये दिल्लगी’ या सिनेमात काजोल व अक्षय कुमारची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. 

अजय भेटला अन् सगळे विसरलीकधी काळी अक्षय कुमारवर भाळणारी काजोल पुढे मात्र अजय देवगणच्या प्रेमात पडली. अजय देवगण व काजोल यांची पहिली भेट 1995 साली झाली होती.  ‘हलचल’च्या सेटवर. अर्थात या पहिल्या भेटीत अजयला काजोल त्याला बडबडी व उद्धट वाटली होती. दुस-यांदा तर त्याला तिला भेटायचेदेखील नव्हते. विश्वास बसणार नाही यानंतर पुढचे दोन वर्षे खरोखर दोघेही एकमेकांना भेटले नाहीत. कारण त्यावेळी अजय दुस-या कोणाला तरी डेट करत होता आणि काजोलदेखील दुस-्या मुलासोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण काही वर्षांनंतर ते भेटले आणि मग त्यांच्यात मैत्री झाली.

अजय काजोलसोबत तासन तास बसायचा आणि काजोल तिच्या नात्यातील प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सल्ला द्यायचा. काजोलचे तिच्या प्रियकरासोबत प्रेम जुळवता जुळवता अजय कधी काजोलच्या प्रेमात पडला हे त्यालाही कळले नाही. काजोलचीही वेगळी अवस्था नव्हती. पुढचा इतिहास तुम्हाला ठाऊक आहेच. 

चंद्राची वाट बघून बघून काजोल वैतागली, फोटो शेअर करत लिहिले - जर जेवण नाही मिळालं तर...

टॅग्स :काजोलअक्षय कुमार