Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘दबंग 3’मध्ये दिसणार काजोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 09:28 IST

सलमान खानच्या ‘दंबग 3’ची चाहत्यांना प्रतिक्षा लागली असतानाच काजोलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ट्रेंड करते आहे. ‘दंबग 3’मध्ये सलमानसोबत काजोलही ...

सलमान खानच्या ‘दंबग 3’ची चाहत्यांना प्रतिक्षा लागली असतानाच काजोलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ट्रेंड करते आहे. ‘दंबग 3’मध्ये सलमानसोबत काजोलही या चित्रपटात दिसू शकते. ‘दबंग’ व ‘दबंग 2’ मध्ये सलमानच्या पत्नीची भूमिका सोनाक्षी सिन्हा हिने साकारली होती. ‘दंबग 3’ मध्ये सलमानच्या अपोझिट नायिका कोण असेल याची चर्चा आता रंगली होती. फिल्मफेअर मॅगझिनच्या वृत्तानुसार, काजोलला ‘दंबग 3’ साठी निर्मात्यांकडून एका भूमिकेसाठी आॅफर करण्यात आले आहे. मात्र याबद्दल अद्याप कोणतिही आधिकृत माहिती देण्यात आली नाही. ‘दंबग’ सिरीजचा निर्माता अरबाज खान याने काही दिवसांपूर्वी सोनाक्षी सिन्हा हिची ‘दंबग 3’मध्ये भूमिका असेल असे सांगितले होते. मात्र आता आणखी एका बड्या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा होत असताना सोनाक्षीची भूमिका कशी असेल याचीही चर्चा रंगणार असल्याचे दिसते. सोनाक्षी सिन्हाच्या जागी परिणीती चोप्रा काम क रेल अशी चर्चा होती. मात्र परिणीतीने या चर्चेला मी ‘दंबग 3’मध्ये भूमिका करीत नसल्याचे सांगून पूर्णविराम दिला होता. त्यानंतर सोनाक्षीच सलमानच्या अपोझिट असेल असे मानले जात होते. मात्र आता अचानक काजोलचे नाव समोर आल्याने सोनाक्षीच्या भूमिकेबाबत उत्सुकता लागली आहे. दरम्यान एका संकेतस्थळाने काही दिवसांपूर्वी कजोल ‘दबंग 3’मध्ये नकारात्मक भूमिका साकारणार नसल्याचे वृत्त दिले होते. आज ट्रेन्ड होणारी बातमी जर खरी असेल तर निर्मात्यांनी स्क्रिप्टमध्ये नक्कीच काही बदल केले असावे.1998 साली आलेल्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटात सलमान व काजोल यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. सलमानचा लहान भाऊ सोहेल खान दिग्दर्शित या चित्रपटात अरबाज खानने काजोलच्या भावाची भूमिका साकारली होती.  बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट हिट ठरला होता. यानंतर करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ व ‘करण-अर्जुन’ दोघांनी एकत्र काम केले आहे.