Join us
Daily Top 2Weekly Top 5

काजोल आणि ट्विंकल खन्नाने एकमेकांच्या बॉयफ्रेंडला केलंय डेट, अभिनेत्रीचा खुलासा ऐकून क्रिती झाली अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:51 IST

Kajol and Twinkle Khanna : तुम्हाला माहिती आहे का, की अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि काजोल यांचा एक कॉमन एक्स-बॉयफ्रेंड आहे? नुकत्याच 'टू मच विथ ट्विंकल अँड काजोल' (Too Much With Twinkle And Kajol) या पॉडकास्टच्या एका एपिसोडमध्ये ट्विंकल खन्नाने हा खुलासा केला.

ट्विंकल खन्ना आणि काजोल यांनी 'टू मच विद ट्विंकल अँड काजोल'च्या एका एपिसोडमध्ये सांगितलं की, दोघांचं एक्स एकच आहे. काजोलने तिला सांगितलं की, ते कोणालाच सांगू नकोस. पाहुणी म्हणून आलेल्या क्रिती सनॉनने तिच्या क्रशबद्दल सांगितले आणि ते खूप रोमँटिक असल्याचं तिने कबुल केले. 

तुम्हाला माहिती आहे का, की अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि काजोल यांचा एक कॉमन एक्स-बॉयफ्रेंड आहे? नुकत्याच 'टू मच विथ ट्विंकल अँड काजोल' (Too Much With Twinkle And Kajol) या पॉडकास्टच्या एका एपिसोडमध्ये ट्विंकल खन्नाने हा खुलासा केला. ट्विंकलच्या या खुलाशानंतर काजोल लाजून गप्प झाली आणि तिने ट्विंकलला त्या व्यक्तीचे नाव न घेण्याची विनंती केली. 'दिस ऑर दॅट' (This or That) गेम खेळताना ट्विंकल आणि काजोलने हा धमाका केला.

जेव्हा त्यांना विचारलं गेलं की, 'सर्वोत्तम मित्रांनी एकमेकांच्या एक्स-बॉयफ्रेंडला डेट करू नये', तेव्हा ट्विंकल खन्ना म्हणाली, "माझे मित्र माझ्यासाठी कोणत्याही पुरुषापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. तो तर कुठेही मिळेल." काजोलकडे पाहत ती पुढे म्हणाली, "आमचा एक एक्स-बॉयफ्रेंड कॉमन आहे, पण आम्ही त्याचे नाव सांगू शकत नाही." यावर काजोलने गोंधळून उत्तर दिले, "गप्प राहा, मी तुला विनंती करते." हे ऐकून सगळे हसले.

क्रिती सनॉननं सांगितलं क्रशबद्दलरोमान्सच्या गप्पा तेव्हाही सुरू होत्या जेव्हा शोमध्ये पाहुणी म्हणून आलेल्या क्रिती सनॉनने तिच्या क्रशबद्दल सांगितले आणि कबूल केले की ती मनाने पूर्णपणे रोमँटिक आहे. ती म्हणाली, "जो कोणी आहे, तो इंडस्ट्रीतील नाही, त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे. मला रोमान्स आवडतो. मला प्रेमात असण्याची कल्पना खूप आवडते. मला प्रेमकथादेखील खूप आवडतात, ज्या आजकाल फार कमी बनवल्या जात आहेत."

कबीर बहियासोबतच्या नात्याची चर्चाक्रिती सनॉन सध्या तिच्या कथित डेटिंग लाईफमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री एका एनआरआय कोट्याधीश वारसदार कबीर बहियासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे, ज्याच्यासोबत ती यापूर्वी वाढदिवसाच्या व्हॅकेशन्ससाठी गेली होती. नोव्हेंबर १९९९ मध्ये जन्मलेला कबीर बहिया हा ब्रिटनचा एक व्यावसायिक असल्याचे सांगितले जाते, ज्याने इंग्लंडमधील एका बोर्डिंग स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kajol, Twinkle dated same boyfriend; Kriti stunned by revelation.

Web Summary : Twinkle Khanna revealed she and Kajol shared an ex-boyfriend. Kriti Sanon spoke about her crush. Twinkle avoided naming the shared ex. Kriti is rumored to be dating Kabir Bahia.
टॅग्स :काजोलट्विंकल खन्नाक्रिती सनॉन