Join us

​ मुलगा अन् सुनेशिवाय कुणालाही ओळखत नाहीत कादर खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 14:01 IST

अनेक बॉलिवूड चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका साकारणारे ७९ वर्षांचे ज्येष्ठ अभिनेते कादर खान सध्या कॅनडात आपल्या मुलासोबत आहेत. गेल्या काही ...

अनेक बॉलिवूड चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका साकारणारे ७९ वर्षांचे ज्येष्ठ अभिनेते कादर खान सध्या कॅनडात आपल्या मुलासोबत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कादर खान आजारी आहेत आणि या आजारपणाने त्यांना लोकांना ओळखणेही कठीण झाले आहे. आधाराशिवाय ऊठू बसू न शकणाºया कादर खान यांना बोलण्यास त्रास होतो. अलीकडे मुलगा आणि सून याशिवाय ते कुणालाही ओळखत नाहीत.कादर खान यांची सून शाइस्ता खान हिने अलीकडे एका मुलाखतीत ही माहिती दिली. पापाजींची प्रकृती स्थिर आहे. सध्या तरी चिंतेचे कारण नाही. वाढते वय आणि या वयासोबत येणारे आजारपण यामुळे ते बरेच अशक्त झाले आहेत. मला आणि सरफराज(कादर खान यांचा मुलगा)अशा आम्हा दोघांशिवाय ते इतरांना चटकन ओळखू शकत नाहीत. दोन्ही नातींसोबत ते आनंदी दिसतात. माझ्या दोन मुलींसोबत मी त्यांचीही पूरेपूर काळजी घेतेयं, असे तिने सांगितले.अलीकडे कादर खान यांचा मुलगा सरफराज याने वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. त्यांना आधाराशिवाय उठता- बसता येत नाही. काही पाऊले चालले की, त्यांना बसावे लागते. कुठे पडू नये , ही भीती कायम असते, असे सरफराज याने सांगितले होते. बॉलिवूडने कादर खान यांचा मोहभंग केला, असेही सरफराज म्हणाला होता. इंडस्ट्रीतील वातावरण बदलले आहे. विश्वास, मैत्रीची जागा व्यवहाराने घेतली आहे. या गोष्टी त्यांना अलीकडे अस्वस्थ करू लागल्या आहेत, असे सरफराज याने सांगितले होते. त्यापूर्वी कादर खान यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेनंतर ते ठीक झालेत. पण यानंतर त्यांना चालायला भीती वाटू लागली. शस्त्रक्रियेच्या दुसºयाच दिवशी डॉक्टरांनी त्यांना चालण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांनी भीतीपोटी हा सल्ला मानला नव्हता. यामुळे त्यांच्या गुडघ्यांचा त्रास वाढला आहे.काही महिन्यांपूर्वी कादर खान यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. ‘हो गया दिमाग का दही’ हा कादर खान यांचा शेवटचा चित्रपट. २०१५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘हिम्मतवाला’, ‘आंखे’,‘कुली नंबर वन’ यासारख्या अनेक चित्रपटांतील विनोदी भूमिकांसाठी ते ओळखले जातात.