चित्रपट तयार होण्याआधीच ४५ कोटींना विकले ‘काबिल’चे सॅटेलाईन राइट्स?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 09:00 IST
हृतिक रोशन याचा आगामी चित्रपट ‘काबिल’बाबत आपण बरेच ऐकून आहोत. या चित्रपटात हृतिकसोबत यामी गौतम झळकणार अशीही चर्चा आहे. ...
चित्रपट तयार होण्याआधीच ४५ कोटींना विकले ‘काबिल’चे सॅटेलाईन राइट्स?
हृतिक रोशन याचा आगामी चित्रपट ‘काबिल’बाबत आपण बरेच ऐकून आहोत. या चित्रपटात हृतिकसोबत यामी गौतम झळकणार अशीही चर्चा आहे. अभिनेत्रीच्या नावाची चर्चा म्हणजे चित्रपटाचे शुटींग सुरु व्हायचेयं, हे तुमच्या लक्षात आले असेलच. पण बातमी पुढे आहे. चित्रपटाचा एक शॉटही चित्रीत झाला नसताना ‘काबिल’चे सॅटेलाईट राईट्स ४५ कोटी रूपयांना विकले गेले आहेत. आहे ना गंमत!! राकेश रोशन निर्मित हा चित्रपट संजय गुप्ता दिग्दिर्शित करीत आहेत. रोनीत रॉय आणि रोहित रॉय निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे. पुढील वर्षी २६ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.