Join us

​‘कबाली’ची रेकॉर्डब्रेक ६५० कोटी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 10:12 IST

रजनीकांतचा ‘कबाली’ २२ जुलैला रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने आतापर्यंत वर्ल्डवाइड ६५० कोटीची कमाई केली आहे. विषेश म्हणजे या कबालीने ...

रजनीकांतचा ‘कबाली’ २२ जुलैला रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने आतापर्यंत वर्ल्डवाइड ६५० कोटीची कमाई केली आहे. विषेश म्हणजे या कबालीने कमाईच्या बाबतीत सलमानचे आतापर्यंत रिलीज झालेल्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडित काढले आहेत. 'कबाली' भारताचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. लवकरच हा सिनेमा सिनमा ७०० कोटींचा आकडा पार करणार असा अंदाज बांधला आहे. ‘पीके’लाही करेल धोबीपछाड...वर्ल्डवाइड कलेक्शनच्या बाबतीत आमिर खानचा 'पीके' सिनेमा पहिल्या नंबरवर आहे. १९ डिसेंबर २०१४ ला रिलीज झालेल्या या सिनेमाने जगभरात ७९२ कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले होते. आता ‘कबाली’ चित्रपट ‘पीके’ला धोबीपछाड करु शकतो का? हा प्रश्न सर्वांनाच पडतो आहे.