Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘की अ‍ॅण्ड का’ टीमची महिलादिनी धम्माल अर्जून बनला शेफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 09:55 IST

बॉलिवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर अर्जून कपूर स्वत: तुमच्यासाठी जेवण तयार करेल, अशी कल्पना करा...काय??? रमलातं??? तुमच्या आमच्यासाठी ही कल्पना ...

बॉलिवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर अर्जून कपूर स्वत: तुमच्यासाठी जेवण तयार करेल, अशी कल्पना करा...काय??? रमलातं??? तुमच्या आमच्यासाठी ही कल्पना असेल पण करिनासह काही  मोजक्या महिला व तरूणींना आज महिला दिनी ही संधी मिळाली. यात काही महिला पत्रकारांचाही समावेश होता. अर्जून व करिना कपूर अभिनीत ‘की अ‍ॅण्ड का’ या चित्रपटाच्या टीमने  महिला दिनानिमित्त महिलांसाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘की अ‍ॅण्ड का’मध्ये अर्जूनने एका सुशील पतीची भूमिका साकारली आहे तर करिना त्याची पत्नी बनली आहे. मग काय, या कार्यक्रमातही ‘सुशील’ अर्जूनने करिनासाठी मसाला आॅमलेट तयार केले. अर्जूनचा हा शेफ अवतार उपस्थित महिलांनी मस्तपैकी एन्जॉय केला. शिवाय अर्जूनने बनवलेल्या मसाला आॅमलेटची चवही चाखली...