Join us

- तर यासाठी गुपचूप जोधपूरला पोहोचली चुलबुली आलिया भट्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:42 IST

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट नव्या वर्षांत अतिशय हॉट अवतारात दिसणार आहे. पण कुण्या चित्रपटात नव्हे तर आंतरराष्ट्रीय फॅशन ...

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट नव्या वर्षांत अतिशय हॉट अवतारात दिसणार आहे. पण कुण्या चित्रपटात नव्हे तर आंतरराष्ट्रीय फॅशन मॅगझीन  ‘वोग’च्या कव्हरपेजवर.  होय, आज जोधपूरच्या ब्रह्मपुरी भागातील प्राचीन हवेलींमध्ये आलियाने ‘वोग’साठी फोटोशूट केले. या फोटोशूटच्या निमित्ताने आलिया जोधपूरमध्ये पोहोचली. जोधपूर विमानतळावरून ती थेट तिच्या हॉटेलकडे रवाना झाली.  निळ्या रंगातील शर्टमधील आलिया या फोटोशूटदरम्यान अतिशय हॉट अवतारात दिसली.खरे तर आलियाने तिच्या या जोधपूर दौ-याबद्दल बरीच गोपनीयता बाळगली होती. चाहत्यांनी गर्दी करू नये, हा यामागचा उद्देश होतो. पण इतके करूनही आलिया येणार हे मीडियाला कळलेच. ती येण्याआधीच मीडियाने आलियाची एक छबी कॅमेºयात कैद करण्यासाठी एकच गर्दी केली. मीडियाला पाहून आलिया कमालीची अवाक झाली. मी जोधपूर येणार आहे, हे अखेर तुम्ही कसे माहित केले? असे ती हसतहसत मीडियाला उद्देशून म्हणाली. विमानतळावरून आपल्या गाडीपर्यंत जाईपर्यंत आलियाने मीडियाच्या काही प्रश्नांची उत्तरे दिलीत. मी इतक्या लहान वयात हे यश पाहतेय. यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते. शेवटी संधी मिळण्यावर आणि मिळालेल्या संधीचे सोने करण्यावरच सगळे काही अवलंबून आहे, असे ती म्हणाली.जोधपूरच्या ब्रह्मपुरी भागातील प्राचीन हवेलींमध्ये आलियाने ‘वोग’साठी फोटोशूट केले.जोधपूरच्या प्राचीन महलांमध्ये आलियाचे हे फोटोशूट झाले. ‘वोग’च्या नववर्षांच्या भारतीय आवृत्तीच्या कव्हरपेजवर आलियाचा झळकणार आहे. यापूर्वी आलियाचा कथित बॉयफ्रेन्ड सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत आलियाने हॉट फोटोशूट केले होते. या हॉट फोटोशूटमुळे आलिया चांगलीच चर्चेत आली होती. आता या नव्या कोºया फोटोशूटमध्ये आलियाचा हॉट अवतार पाहण्याची उत्सूकता तुम्हा-आम्हाला असणारच. पण त्यासाठी काही काळ प्रतीक्षा ही आलीच...लवकरच आलिया  वरूण धवनसोबत ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटात दिसणार आहे.