पत्नीच्या हाती दिली तुरुंगातील कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 09:34 IST
तुरूंगातून सुटल्याबरोबर संजयने काय केले असेल तर एका आदर्श पतीप्रमाणे तुरुंगातील त्याची कमाई पत्नी मान्यताच्या हाती ठेवली. मुंबईत येताच ...
पत्नीच्या हाती दिली तुरुंगातील कमाई
तुरूंगातून सुटल्याबरोबर संजयने काय केले असेल तर एका आदर्श पतीप्रमाणे तुरुंगातील त्याची कमाई पत्नी मान्यताच्या हाती ठेवली. मुंबईत येताच तो आई नरगिस हिच्या समाधीस्थळी गेला. आईच्या समाधीवर त्याने फुले चढवली. आई, मी मुक्त झालो,असे तो याठिकाणी म्हणाला. पत्रकारांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. संजयने या सर्व प्रश्नांना अतिशय संयमीपणे उत्तरे दिलीत. स्वातंत्र्याचा खरा अर्थ आता मला समजला आहे. तुरुंगातून सुटणार, या भावनेने गेल्या चार दिवसांपासून मी झोपलो नव्हतो, असे त्याने सांगितले. तुरुंगात सगळे मला मिश्राजीचं म्हणतं, असेही त्याने सांगितले.