Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्युनियर बीनं सोडली ऐशची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 15:20 IST

 बॉलीवुडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबात मोठं वादळ आलंय. त्यांच्या लेकाच्या अर्थात ज्युनियर बी अभिषेक-ऐश्वर्याच्या सुखी ...

  बॉलीवुडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबात मोठं वादळ आलंय. त्यांच्या लेकाच्या अर्थात ज्युनियर बी अभिषेक-ऐश्वर्याच्या सुखी संसारात रिअल अभिमान घडतोय की काय. असे एक ना अनेक सवाल सध्या फॅन्सना सतावतायत. अमिताभ आणि जया बच्चन यांच्या अभिमान सिनेमात जया बच्चन यांनी गायिका साकारली होती. या गायिकेला अचानक फेम मिळतं. त्यामुळं सिनेमात तिचा पती असलेल्या अमिताभच्या करियरला उतरती कळा लागते. करियरच्या या चढउतारामुळं दोघांच्या नात्यात कटुता येते. अमिताभ-जया यांची रिल अभिमानची कथा ऐश-अभिच्या बाबतीत रियलमध्ये घडतेय का असा सवाल निर्माण झालाय.         याचं कारण म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात काही तरी बिनसलंय. याचीच प्रचिती आली ती 'सरबजीत' सिनेमाच्या प्रिमीयरच्या वेळी. ऐशच्या सरबजीत सिनेमाच्या प्रिमीयरसाठी अवघं बॉलीवुड आणि बच्चन कुटुंबीय तसंच ऐशचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी बच्चन फॅमिलीला कॅमे-यात टिपण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. सगळ्यांचं फोटोसेशन झाल्यानंतर ऐश आणि अभिची एकत्र पोझ घेण्यासाठी कॅमेरामन्सनी आग्रह धरला. मात्र यावेळी अभिषेकच्या चेह-यावरील भाव बरेच काही सांगून गेले. ऐश बरीच खुश होती तर अभिषेक नावापुरता तिथे हजर होता. त्याचवेळी आता फक्त ऐशचे फोटा काढा अशा आविर्भावात अचानक अभिषेकनं तिथून काढता पाय घेतला. यामुळं ऐश भलतीच नाराज झाली आणि हा सगळा प्रकार कॅमे-यात कैद झाला.ऐश सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. कान्स सारख्या फेस्टिव्हलमुळं जगभरात तिच्या नावाचा डंका वाजतोय. तर दुसरीकडे अभिषेकला अजूनही बॉलीवुडमध्ये म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. त्यामुळं अमिताभ-जया यांचा रिल अभिमान रिअल ऐश-अभिच्या बाबतीत घडत तर नाही ना हे 'सरबजीत' सिनेमाच्या प्रिमीयर वेळी घडलेल्या प्रकारामुळं बोललं जातंय.