Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आपल्या नायकाच्या मुलीला भेटून आनंदित झाली जुही चावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 15:32 IST

जुही चावला आणि शाहरुख खान यांनी यस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्तानी, डर, राम जाने, राजू बन गया ...

जुही चावला आणि शाहरुख खान यांनी यस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्तानी, डर, राम जाने, राजू बन गया जंटलमॅन, वन टू का फोर, ड्युप्लिकेट यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्या दोघांमधील केमिस्ट्री खूपच चांगली असल्याने प्रेक्षकांना त्यांची जोडी खूप आवडते. त्या दोघांनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ते दोघे खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. ते दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांचे बिझीनेस पार्टनर देखील आहेत. कोलकता नाइट् राइडर ही आयपीएल मधील टीमदेखील जुही आणि शाहरुखच्या मालकीची आहे. शाहरुख आणि जुहीला अनेक वेळा एकमेकांसोबत पाहाण्यात येते. जुहीचा सगळ्यात जवळचा मित्र शाहरुख असल्याचे तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.जुही आणि शाहरुख यांची मैत्री अनेक वर्षांपासून असल्यामुळे त्या दोघांचे एकमेकांच्या घरी नेहमीच येणे जाणे असते. एकमेकांच्या पार्टींमध्य ते दोघे आवर्जून उपस्थिती लावतात. त्यामुळे त्या दोघांची मुले देखील एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात. शाहरुखची मुलगी सुहानाला जुहीने लहानपणापासूनच पाहिले आहे. त्यामुळे जुहीचे सुहानासोबतचे नाते खूप चांगले आणि वेगळे  आहे. सुहाना आणि जुहीची भेट नुकतीच एका कार्यक्रमात झाली होती. सुहानाला भेटून जुहीला चांगलाच आनंद झाला होता. या भेटीबाबत जुहीनेच सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सना सांगितले आहे.अक्षय खन्नाच्या इतेफ्फाक या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्रा देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून ही एक मर्डर मिस्ट्री आहे. या चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच मुंबईत झाले. या स्क्रीनिंगच्या वेळी जुही आणि सुहाना यांची भेट झाली होती. जुहीनेच सुहानासोबतचा फोटो ट्विटरवर अपलोड करून अतिशय सुंदर असलेल्या सुहानाला मी इत्तेफाकच्या स्क्रीनिंगला भेटले. तिला भेटून मला खूपच आनंद झाला असे म्हटले आहे.या फोटोत जुही पांढऱ्या आणि अबोली कुर्त्यात तर सुहाना काळ्या रंगाच्या टी-शर्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या दोघी या फोटोत खूपच सुंदर दिसत आहेत.  Also Read : सात महिन्याची गरोदर असताना जुही चावलाने या चित्रपटासाठी केले होते चित्रीकरण