Judwaa 2:सलमान खानसह जॅकलिनचं ‘टन टना टन,चलती है क्या 9 से 12' व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 13:15 IST
या व्हिडीओवर रसिकांच्या कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता वरुण धवन डबल रोलमध्ये पाहायला मिळणार असून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्याही यांत प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचं टन टना टन हे पहिलं गाणे 24 ऑगस्टला रिलीज झालं. या गाण्यात वरुणसह जॅकलिन आणि तापसी थिरकताना पाहायला मिळत आहेत. दबंग सलमान खानच्या 90च्या दशकात गाजलेल्या जुडवाँ सिनेमाचा सिक्वेल असलेल्या या सिनेमाबाबत रसिकांमध्येही उत्सुकता आहे.
Judwaa 2:सलमान खानसह जॅकलिनचं ‘टन टना टन,चलती है क्या 9 से 12' व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
सध्या बॉलिवूडमध्ये वरुण धवन स्टारर जुडवाँ-2 या सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. हा सिनेमा 29 सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. याच पार्श्वभूमीववर दबंग सलमान खान आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस या दोघांचा टन टना टन...चलती है क्या 9 से 12 गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत चालला आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. वरुण खास तुझ्यासाठी ख-या जुडवाँ सलमान खानसह टन टना टन अशी पोस्टही जॅकलिननं शेअर केली आहे. या व्हिडीओवर रसिकांच्या कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता वरुण धवन डबल रोलमध्ये पाहायला मिळणार असून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू यांच्याही यांत प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचं टन टना टन हे पहिलं गाणे 24 ऑगस्टला रिलीज झालं.या गाण्यात वरुणसह जॅकलिन आणि तापसी थिरकताना पाहायला मिळत आहेत. दबंग सलमान खानच्या 90च्या दशकात गाजलेल्या जुडवाँ सिनेमाचा सिक्वेल असलेल्या या सिनेमाबाबत रसिकांमध्येही उत्सुकता आहे. त्यामुळे या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. त्यामुळेच जॅकलिननं सलमानसह थिरकत सिनेमाचं एकप्रकारे प्रमोशनच केले आहे. जॅकलिनच नाहीतर वरुणही ओरिजनल जुडवाँ स्टारकास्टसह प्रमोशन करत आहे. काही दिवसांपूर्वी वरुण आणि करिष्मा कपूर जुडवाँ सिनेमाच्या गाण्यावर थिरकताना दिसले होते. त्यानंतर वरुण आणि करिष्माचा हा व्हिडीओही व्हायरल झाला होता. सध्या जुडवाँ-2 या सिनेमाच्या गाण्यांनी रसिकांना वेड लावले आहे. या सिनेमातील टना टना टन आणि ऊँची है बिल्डिंग या गाण्यांचं नवं वर्जन रसिकांना चांगलंच भावतंय. त्यामुळे जुडवाँ-2 सिनेमाचं प्रमोशन करण्यात सिनेमाची टीम कोणतीही कसर सोडत नसल्याचं या निमित्ताने पाहायला मिळत आहे.वरुणला डबल रोलमध्ये बघण्यासाठी त्याचे चाहते फार दिवसांपासून आतुरत आहेत.'जुडवा 2'च्या ट्रेलरने जर एवढी धमाल उडवली तर चित्रपट किती मसालेदार असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. वरूण धवन 'जुडवा 2' मध्ये राजा आणि प्रेमची भूमिका साकारणार आहे.Also Read:Don't miss : पाहा, ‘जुडवा2’चा धमाकेदार ट्रेलर...!