Join us

​जॅकलिनला हवायं ‘जुडवा2’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 21:38 IST

जॅकलिन फर्नांडिस सध्या जोरात आहे. यंदा ‘हाऊसफुल ३’ आणि ‘ढिशूम’ या दोन्ही चित्रपटांमध्ये जॅकलिन भाव खावून गेली. लवकरच जॅकलिन ...

जॅकलिन फर्नांडिस सध्या जोरात आहे. यंदा ‘हाऊसफुल ३’ आणि ‘ढिशूम’ या दोन्ही चित्रपटांमध्ये जॅकलिन भाव खावून गेली. लवकरच जॅकलिन ‘ अ फ्लाईंग जट’ या चित्रपटात झळकणार आहे. यानंतर सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या एका अ‍ॅक्शनपटातही जॅकलिन दिसणार आहे. शिवाय सुशांत सिंह राजपूत यांच्यासोबतचा एक चित्रपटही जॅकलिनच्या हातात आहे. केवळ एवढेच नाही तर आता चर्चा आहे ती वरूण धवनसोबतच्या ‘एबीसीडी ३’ आणि ‘जुडवा2’ या चित्रपटातही जॅकची वर्णी लागणार असल्याची. यासंदर्भात खुद्द जॅकलिनलाच विचारण्यात आले. पण ‘एबीसीडी3’मध्ये मी नाही, हे जॅकने प्रामाणिकपणे कबुल केले. वरूण या चित्रपटात आहे, हे नक्की आहे. पण अभिनेत्री कोण असेल हे मला ठाऊक नाही. मला अद्याप ‘एबीसीडी ३’ची आॅफर आलेली नाही वा हा चित्रपट मी साईन केलेला नाही. ‘जुडवा2’चे म्हणाल तर या चित्रपटात असणे कुणालाही आवडेल. मी तर या चित्रपटासाठी फिंगर क्रॉस करेल, असे जॅक म्हणाली. तेव्हा आॅल दी बेस्ट जॅक ! चालू वर्षांइतकेच येणारे वर्षही तुझ्यासाठी भरभराटीचे ठरो, हीच शुभेच्छा!!