जॉन म्हणतो, मला यशापयशाची चिंता नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 20:12 IST
कुठल्याही चित्रपटातील अभिनेत्याचा अभिनय प्रेक्षकांच्या मनाला किती स्पर्शून जातो, यावर त्या चित्रपटाचे यशापयश अवलंबून असते. परंतु यात प्रत्येकवेळी अभिनेत्याला ...
जॉन म्हणतो, मला यशापयशाची चिंता नाही
कुठल्याही चित्रपटातील अभिनेत्याचा अभिनय प्रेक्षकांच्या मनाला किती स्पर्शून जातो, यावर त्या चित्रपटाचे यशापयश अवलंबून असते. परंतु यात प्रत्येकवेळी अभिनेत्याला यश मिळेलच याची खात्री देता येत नाही, अशी भावना अभिनेता जॉन अब्राहम याने व्यक्त केली आहे. चांगल्या कलावंतांची फौज असूनही एखादा चित्रपट बॉक्स आॅफिसवर आपटत असेल तर याचा अर्थ त्या अभिनेत्यांना प्रेक्षकांची नाळ ओळखताच आली नाही असे आहे. केवळ तुम्ही मोठे स्टार आहात या एकाच सबळ निकषावर तुम्ही चित्रपटाच्या यशाची खात्री देवू शकत नाहीत. म्हणूनच मी कधी चित्रपटाच्या यशापयशाची फारसी चिंता करीत नाही. मी फक्त माझे काम मनापासून एन्जॉय करीत असतो, असे जॉन आज एका मुलाखतीत म्हणाला. जॉनचा ‘ढिशूम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ‘जिस्म’ या चित्रपटातून जॉनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते आणि पुढे ‘दोस्ताना’, ‘धूम’ अशा चित्रपटातून आपली अभिनय क्षमता सिद्ध केली होती, हे इथे आवर्जून सांगायला हवेच...होय ना!!