Join us
Daily Top 2Weekly Top 5

​जॉन म्हणतो, मला बायोपिकमध्ये रस नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 22:13 IST

होय, बॉलिवूडचा हँडसम बॉय जॉन अब्राहमला बायोपिकमध्ये जराही रस नाही. तुला कुणाच्या बायोपिकमध्ये भूमिका वठवायला आवडेल, असा प्रश्न अलीकडे ...

होय, बॉलिवूडचा हँडसम बॉय जॉन अब्राहमला बायोपिकमध्ये जराही रस नाही. तुला कुणाच्या बायोपिकमध्ये भूमिका वठवायला आवडेल, असा प्रश्न अलीकडे जॉनला विचारण्यात आला. यावर जॉन कुणाचे नाव घेणार, ही उत्सूकता असतानाच, मला बायोपिकमध्ये सध्यातरी जराही स्वारस्य नाही, असे  एका दमात सांगून जॉन मोकळा झाला. आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये जॉनने कॉमेडी, ड्रामा, अ‍ॅक्शन, रोमान्स अशा अनेक प्रकारचे चित्रपट केले. पण सध्या तरी जॉन अ‍ॅक्शन स्टार म्हणून ओळखला जातोय. आता अ‍ॅक्शन स्टार या नव्या बिरूदाबाबत जॉनचे काय मत आहे? तर जॉनला स्वत: अ‍ॅक्शन स्टार ही ओळख आवडलेली दिसतेय. अ‍ॅक्शन स्टारसाठी अ‍ॅक्शन स्टारचे अ‍ॅटिट्यूड हवे. तुमची बॉडी किंवा चालण्या-बोलण्यात नाही तर तुमच्या डोळ्यांत हे अ‍ॅटिट्यूड दिसले पाहिजे, असे जॉन म्हणाला. एकंदर काय तर सध्या जॉन अ‍ॅक्शन स्टार म्हणून मिरवणे अधिक पसंत करतोय.