Join us

​जॉन म्हणतो, अ‍ॅक्शन हिरो हीच माझी ओळख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 16:28 IST

‘रेस 2’,‘रॉकी हँडसम’, ‘वजीर’,‘ढिशूम’ या अनेक चित्रपटात जॉन अब्राहम अ‍ॅक्शन करताना दिसला आणि त्याचा अ‍ॅक्शन अवतार  प्रेक्षकांना चांगलाच भावला. ...

‘रेस 2’,‘रॉकी हँडसम’, ‘वजीर’,‘ढिशूम’ या अनेक चित्रपटात जॉन अब्राहम अ‍ॅक्शन करताना दिसला आणि त्याचा अ‍ॅक्शन अवतार  प्रेक्षकांना चांगलाच भावला. यानंतर अ‍ॅक्शन हिरो ही जॉनची नवी ओळख तयार झाली. स्वत: जॉनलाही त्याची हीच ओळख प्रिय आहे. इतकी की ही ओळख मी इतर कुणालाही देऊ इच्छित नाही. मला ही ओळख मिरवायला आवडते, असे जॉनने म्हटलेय. तुला कुणासोबत अ‍ॅक्शन करायला आवडतं, असे विचारले असता न्यू जनरेशनमधील वरूण धवन आणि टायगर श्रॉफ यांच्या नावाला जॉनने पसंती दिली. वरूण आणि टायगर दोघेही जबरदस्त अ‍ॅक्शन करतात. ‘ढिशूम’मध्ये वरूणने पहिल्यांदा अ‍ॅक्शन सीन दिले. मी त्याच्या प्रत्येक अ‍ॅक्शन सीनचे निरीक्षण केले. अगदी सराईतासारखे सीन त्याने दिले, असे जॉन म्हणाला. मला अक्षय कुमारप्रमाणेच स्वत:चे अ‍ॅक्शन सीन स्वत: करायला आवडतात. अक्षयला जितके अ‍ॅक्शन प्रिय आहे. तितकेच मलाही.  माझ्यासारखेच इतर अभिनेत्यांनीही अधिकाधिक अ‍ॅक्शन फिल्म्स करून ‘अ‍ॅक्शन’चा आनंद घ्यावा, असेही तो म्हणाला.