Join us

जॉन अब्राहमचा खुलासा, ‘माझ्यात आणि अक्षयमध्ये कुठलेही भांडण नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 19:38 IST

अभिनेता जॉन अब्राहमचा ‘परमाणू : द स्टोरी आॅफ पोखरण’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई ...

अभिनेता जॉन अब्राहमचा ‘परमाणू : द स्टोरी आॅफ पोखरण’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई करीत आहे. पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने समाधानकारक मजल मारली असून, पुढील आठवड्यात कमाईच्या आकड्यांमध्ये भर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, जॉन अब्राहमने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एका अशा गोष्टीचा खुलासा केला ज्यामुळे तो सध्या चर्चिला जात आहे. जॉनचे हे ट्विट अक्षय आणि त्याच्यातील नात्यावर आधारित आहे. जॉनचा ‘परमाणू’ हा चित्रपट सध्या बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई करीत आहे. याचदरम्यान जॉनने अक्षयकुमारसोबत असलेल्या त्याच्या नात्यावरून एक ट्विट केले. विशेष म्हणजे त्याने हे ट्विट अक्षयकुमारला टॅगही केले. त्यात त्याने लिहिले, ‘मी असे ऐकले आहे की, मी आणि माझा भाऊ अक्षयकुमार भांडत आहोत. तो मला मारणार आहे. माफ करा, पण या बातम्यांमध्ये काहीही तथ्यता नाही. यावेळी केवळ स्क्रीनवर ‘परमाणू’चेच धमाके होत आहेत.’ दरम्यान, जॉनच्या ‘परमाणू’चा वादाशी खूपच जवळून संबंध आला आहे. क्रिअर्ज एंटरटेनमेंटच्या प्रेरणा अरोरा आणि जॉनमध्ये या चित्रपटावरून चांगलाच वाद रंगला होता. दोघांमधील हे प्रकरण एवढे विकोपाला गेले होते की, त्यांनी थेट न्यायालयाचेच दरवाजे ठोठावले होते. त्यावेळी जॉनने त्याची बाजू न्यायालयात अतिशय प्रबळपणे मांडली होती. न्यायालयानेही त्याच्याच बाजूने निकाल दिला. प्रेरणा अरोराचा इतरही काही चित्रपट प्रोजेक्टमध्ये वाद झाला आहे.