Join us  

जॉन अब्राहम पुन्हा परतला! ‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर रिलीज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 2:37 PM

‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. बॉलिवूडचा अ‍ॅक्शन मॅन जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

ठळक मुद्देट्रेलरमधील जॉनची अ‍ॅक्शन तुमच्या अंगावर रोमांच उभे केल्याशिवाय राहणार नाही.  यात जॉनने भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका सीरिअल किलरची भूमिका साकारली आहे. 

सत्यमेव जयते’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. बॉलिवूडचा अ‍ॅक्शन मॅन जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरकडे जॉनचे चाहते नजरा लावून बसले होत़. याचे कारण म्हणजे, जॉनचा यापूर्वी आलेला ‘परमाणु’ हा चित्रपट. ‘परमाणु’ला बॉक्सआॅफिसवर मोठा प्रतिसाद मिळाला होता. साहजिकचं यानंतर जॉनकडून असलेल्या लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यामुळे ‘सत्यमेव जयते’च्या ट्रेलकची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर आज हा ट्रेलर रिलीज झाला.

ट्रेलरमधील जॉनची अ‍ॅक्शन तुमच्या अंगावर रोमांच उभे केल्याशिवाय राहणार नाही.  यात जॉनने भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका सीरिअल किलरची भूमिका साकारली आहे. आपल्या पित्याच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी तो एकटाच मैदानात उतरला आहे. या लढाईत जॉन अनेकांना संपवतो. खाकीच्या रक्षणासाठी खाकीच्याच विरोधात उभा राहतो. मनोज वाजपेयी हा सुद्धा ट्रेलरमध्ये दिसतोय. पण त्याची ही भूमिका अलीकडे त्याने ‘बागी2’मध्ये साकारलेल्या भूमिकेसारखी भासतेय. सीरिअल किलरच्या शोधात असलेला पोलिस अधिकारी मनोज साकारतो आहे.भरपूर अ‍ॅक्शन आणि ड्रामा याने रंगलेला ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट स्वातंत्र्य दिनी रिलीज होतो आहे. म्हणजेच, या चित्रपटाचा ‘गोल्ड’ आणि ‘यमला पगला दीवाना फिरसे’ चित्रपटांशी बॉक्सआॅफिस संघर्ष बघायला मिळणार आहे. १५ आॅगस्टलाच अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. याच दिवशी देओल ब्रदर्सचा ‘यमला पगला दीवाना फिर से’ही प्रदर्शित होतो आहे आणि नेमक्या याच दिवशी आता जॉनचा ‘सत्यमेव जयते’ही बॉक्सआॅफिसवर धडकणार आहे. आता या तिन्ही पैकी तुम्ही सर्वांत आधी कुठला चित्रपट पाहाल, याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. अर्थातच या निर्णयाआधी ‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर एकदा तरी पाहायलाचं हवा.

 

टॅग्स :सत्यमेव जयते चित्रपटसिनेमाबॉलिवूडजॉन अब्राहममनोज वाजपेयी