Join us

​जॅझी बीला एअरपोर्टवर पकडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 00:36 IST

गायक जॅझी बी उर्फ जसविंदर सिंग बैन्सला चंदिगड विमानतळावर मोठ्या प्रमाणात कॅश घेऊन जाताना पोलिसांनी पकडले आहे. परवानगीपेक्षा जास्त ...

गायक जॅझी बी उर्फ जसविंदर सिंग बैन्सला चंदिगड विमानतळावर मोठ्या प्रमाणात कॅश घेऊन जाताना पोलिसांनी पकडले आहे. परवानगीपेक्षा जास्त पैसे बाळगून तो विमानाने प्रवास करत होता. ताब्यात घेतल्यावर बराच वेळ त्याची कसून चौकशी करण्यात आली.हाती आलेल्या माहितीनुसार, नमूद न करता जॅझी बी स्वत: जवळ सुमारे पाच लाख रुपये बाळगून दिल्लीहून चंदीगडला आला होता. राजधानातील आयकर विभागाने विमानतळ अधिकाºयांना आगोदरच याची पूर्वसचना देऊन ठेवली होती. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली.जॅझी बी हा पंजाबी गायक असून यो यो हनी सिंगसह गायिलेल्या ‘रोमियो’ आणि ‘दिस पार्टी गेटिंग हॉट’ अशा गाण्यांसाठी तो प्रसिद्ध आहे.