Join us

राज्यसभेत जया बच्चनचा आरोप; हा तर चित्रपटांच्या सर्जनशीलतेवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 18:26 IST

जयपूर येथे ‘पद्मावती’च्या सेटवर राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालताना तोडफोड करीत संजय लीला भन्साळी यांच्याशी गैरवर्तणूक केली होती. ...

जयपूर येथे ‘पद्मावती’च्या सेटवर राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालताना तोडफोड करीत संजय लीला भन्साळी यांच्याशी गैरवर्तणूक केली होती. याघटनेचा विरोध नोंदविण्यासाठी चित्रपट निर्माते समोर आले होते. मात्र स्थानिक सरकारकडून क ोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने हा चर्चेचा विषय ठरला. राज्यसभा सदस्य अभिनेत्री जया बच्चन यांनी शून्य काळात ‘पद्मावती’च्या सेटवर घातलेला धिंगाणा हा चित्रपटाच्या सर्जनशीलतेवर हल्ला असल्याचा आरोप केला. अशा घटनांची पुनरावृत्ती थांबविण्यासाठी सरकारकडून क ठोर पावले उचलण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली. समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन ‘पद्मावती’च्या सेटवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करून म्हणाल्या, आपल्या संविधानाने अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य सर्वांना दिले आहे. मागील काही काळात असहिष्णुतेच्या घटनांत वाढ झाली आहे. अनेक घटनांमध्ये राजकीय संरक्षण मिळत असावे असेच दिसते. जे लोक अशा घटनांसाठी जबाबदार आहेत त्यांचा कायदा व सुव्यवस्थेशी कोणताच संबंध नसतो. भारतीय चित्रपट व्यवसाय हा अनेक लोकांच्या रोजगाराचे साधन आहे. हा व्यवसाय अशा प्रकारच्या घटनांचा वारंवार सामना करतो आहे. मोठ्या संख्येने रोजगार निर्माण करणाºया या व्यवसायात केवळ मनोरंजनासाठी क ल्पनांशक्तीच्या आधारावर चित्रपटांची निर्मिती केली जाते. कधी कथेवर आक्षेप घेतला जातो तर कधी संवादांवरून तक्रार केली जाते. कथानक, गीत, संगीत व परिस्थिती यांच्यावरही आक्षेप नोंदविण्यासाठी तोडफोड केली जाते. याचा परिणाम थेट चित्रपटाच्या रचनात्मकतेवर होतो. जया बच्चन म्हणाल्या, नुकतेच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या जयपूर येथील सेटवर तोडफोड करण्यात आली. महागडी उपकरणे नष्ट करण्यात आली, भन्साळी यांच्यावर हल्ला करण्यात आला. भारतीय चित्रपट सृष्टीतील भन्साळी हे प्रसिद्ध नाव आहे, त्यांच्यासोबत अशा घटना होऊ नयेत. भन्साळी यांच्या दिग्दर्शनात २००८ साली पद्मावतीचे सादरीकरण पॅरिस येथील दू शॅटेलेट या आॅपेरामध्ये केले होते. रोजगार देणाºया एका मोठ्या व्यवसायावर व त्याच्या सर्जनशीलतेवर होणारे हल्ले थांबविण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारावी. जया बच्चन यांच्या या मुद्दयाला विविध राजकीय पक्षांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. २७ जानेवारीला संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनात तयार होणाºया पद्मावतीच्या सेटवर राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. ‘पद्मावती’या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुक ोण ही ‘राणी पद्मावती’ची भूमिका साकारत आहे.