Join us

​इशा देओलच्या डोहाळ जेवणात का भडकल्या जया बच्चन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 12:23 IST

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांना आपण सगळेच ओळखतो. जया बच्चन म्हणजे नियमाच्या पक्क्या. अनेक प्रसंगी नियमावर बोट ठेवून समोरच्यांना ...

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांना आपण सगळेच ओळखतो. जया बच्चन म्हणजे नियमाच्या पक्क्या. अनेक प्रसंगी नियमावर बोट ठेवून समोरच्यांना फैलावर घेतांना आपण जया बच्चन यांना बघितले आहे. असाच एक किस्सा तुम्हाला आठवत असेल. होय, एका पत्रकाराने ऐश्वर्या राय बच्चन हिला ऐश्वर्या म्हणून संबोधले होते आणि जया यांचा पारा भडकला होता. ऐश्वर्या तुझी मैत्रिण आहे का? असा थेट सवाल जयाने त्या पत्रकाराला विचारला होता. केवळ इतकेच नाही तर एकदा त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांनाही असेच खडसावले होते. महिलांपेक्षा गायींची चिंता बाळल्याबद्दल त्यांनी भाजपाला धारेवर धरले होते. ALSO READ : नील नितीन मुकेशच्या रिसेप्शनला अमिताभ आणि रेखा यांचा असाही 'सिलसिला' !अलीकडे हेमा मालिनी यांची मुलगी इशा देओल हिच्या डोहाळ जेवणावेळीही जयांचा हाच ‘अँग्री’ अवतार पाहायला मिळाला होता.  इशा देओलचे काही जवळचे मित्र आणि हेमा मालिनीचे काही मित्र या सोहळ्याला हजर होते. यात जया बच्चन यांचाही समावेश होता. या कार्यक्रमात सगळे काही रिती-रिवाजाप्रमाणे व्हावे, यावर जया बच्चन जातीने लक्ष ठेवून होत्या. पण असे होत नाही असे दिसल्यावर त्यांचा पारा चढला. विधी करण्यासाठी याठिकाणी भटजींची टीम हजर होती. पण ही भटजींच्या टीममधील एकाचा इशा देओलसोबत सेल्फी घेण्याचा खटाटोप सुरु होता. जया बच्चनला हे दिसले आणि त्यांनी सेल्फी घेणाºया त्या भटजींना  चांगलेच खडसावले. आधी पूजेवर लक्ष द्या मग सेल्फी घ्या, असे त्यांनी त्याला सुनावले. मग काय, जया बच्चनचे हे वाक्य ऐकून भटजींची सगळीच टीम चांगलीच वरमली. याऊलट उपस्थितांमध्ये सगळीकडे खसखस पिकली.