Join us

जया बच्चन यांनीच मुलगा अभिषेकला राणी मुखर्जीपासून दूर होण्याचा दिला होता सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 20:23 IST

एकेकाळी इंडस्ट्रीत अभिनेता अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्यातील लव्हस्टोरी बराच काळ चर्चेचा विषय ठरली होती. ‘युवा’च्या सेटवर अभिषेक ...

एकेकाळी इंडस्ट्रीत अभिनेता अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्यातील लव्हस्टोरी बराच काळ चर्चेचा विषय ठरली होती. ‘युवा’च्या सेटवर अभिषेक आणि राणीत प्रेमांकूर फुलले होते. त्यानंतर बºयाचशा चित्रपटांमध्ये ही जोडी पडद्यावर एकत्र झळकली. मात्र ‘बंटी और बबली’ व्यतिरिक्त यांचा एकही चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकला नाही. ‘बस इतना सा ख्वाब हैं, युवा, बंटी और बबली, कभी अलविदा ना कहना, लागा चुनरी में दाग’ आदी चित्रपटांमध्ये काम केले. मात्र २००७ मध्ये आलेल्या ‘लागा चुनरी में दाग’ हा चित्रपट या दोघांचा अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच असा अंदाज लावला जात होता की, अभिषेक आणि राणी लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान असे काही घडले ज्यामुळे हे दोघांमधील नाते कायमचे तुटले. वास्तविक, या चित्रपटात अभिषेकची आई जया बच्चन यांनी राणी मुखर्जीच्या आईची भूमिका साकारली होती. काही दिवसांपर्यंत या दोघींमध्ये खूप चांगले संबंध होते. परंतु अचानकच दोघींमध्ये अबोला निर्माण झाला. राणी मुखर्जीच्या एका कृत्यामुळे जया यांना एवढा राग आला होता की, त्यांनी तिच्यासोबत बोलणे बंद केले. पुढे राणीनेदेखील जयासोबत बोलणे बंद केले. त्यामुळे संपूर्ण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघींमध्ये अबोला बघावयास मिळाला. दोघी न बोलताच चित्रपटाची शूटिंग पूर्ण करण्यात आली. पुढे चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर राणीच्या परिवारातील लोकांनी अभिषेक आणि राणीच्या लग्नाचा प्रस्ताव जया यांच्याकडे मांडला. परंतु त्यांनी स्पष्ट शब्दात यास नकार दिला. जया बच्चन राणीवर बराच काळ संतापलेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी अभिषेकला स्पष्ट शब्दात सांगितले होते की, ‘तू राणीला विसरून जा’ अभिषेकनेदेखील आईचे म्हणणे ऐकत राणीपासून दुरावा निर्माण केला. पुढे या दोघांच्या भेटी बंद झाल्या. कालांतराने त्यांच्या लव्ह स्टोरीचा ‘दी एण्ड’ झाला.