Join us  

पुन्हा बरसल्या जया बच्चन! लोकांनी दिला सुनेसारखे ‘कूल’ राहण्याचा सल्ला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 10:18 AM

पापाराझींनी फोटोंसाठी पिच्छा पुरवणे तर दूर, एखादा फोटो काढला तरी जया बच्चन यांचा पारा चढतो. आत्तापर्यंत अनेकदा जया बच्चन मीडिया व फोटोग्राफवर बरसल्या आहेत. ताजा किस्साही असाच.

ठळक मुद्देजया बच्चन यांना इतका राग का येतो, हे आत्तापर्यंत अनेकांना पडलेले कोडे होते. पण अलीकडे जया यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले होते. जया बच्चन या claustrophobic या आजाराने पीडित आहे.

पापाराझींनी फोटोंसाठी पिच्छा पुरवणे तर दूर, एखादा फोटो काढला तरी जया बच्चन यांचा पारा चढतो. आत्तापर्यंत अनेकदा जया बच्चन मीडिया व फोटोग्राफवर बरसल्या आहेत. ताजा किस्साही असाच. जया बच्चन यांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. यात त्या फोटो काढणाऱ्या चाहत्यांना तंबी देताना दिसत आहेत.अलीकडे करण जोहरची आई हिरू जोहर यांचा वाढदिवस साजरा झाला. जया बच्चन या पार्टीला पोहोचल्या. पार्टीमधून बाहेर पडत असताना, ताटकळत उभ्या असलेल्या चाहत्यांनी जया बच्चन यांची छबी कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. जया बच्चन यांना हे मुळीच आवडले नाही आणि मग, फोटो काढणा-या एका चाहत्याचा त्यांनी चांगलाच क्लास घेतला.

तू फोटो काढण्यापूर्वी मला विचारलेस? माझी परवानगी घेतली? परवानगी न घेता तू फोटो काढलेच कसे? जरा सौजन्य शिक, असे त्यांनी त्या चाहत्याला सुनावले. अन्य एका चाहत्यालाही त्यांनी अशाच शब्दांत सुनावले. जया बच्चन यांच्या संतापाचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. केवळ इतकेच नाही तर लोकांनी हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने त्यांना सूनेसारखे ‘कूल’ राहण्याचा सल्ला दिला आहे. अन्य एका युजरने त्यांना भारतीय सासू असे म्हटले आहे. एकाने जया बच्चन यांची टर उडवत, जया यांना अमरीश पुरी यांची भूमिका द्यायला हवी, असे लिहिले आहे.

जया बच्चन यांना इतका राग का येतो, हे आत्तापर्यंत अनेकांना पडलेले कोडे होते. पण अलीकडे जया यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले होते. जया बच्चन या claustrophobic या आजाराने पीडित आहे. ही एक प्रकारची मानसिक स्थिती आहे. या आजाराने पीडित व्यक्ती अचानक गर्दी पाहून बेचैन होते. अनेकदा तिला राग येतो. गर्दीच्या ठिकाणी हे लोक अस्वस्थ होतात. श्वेताने सांगितल्या नुसार, गर्दी पाहिली की, जया अस्वस्थ होतात. कुणी धक्का दिलेला वा चुकूनही स्पर्श केलेले त्यांना सहन होत नाही. कॅमे-याचा प्रकाश डोळ्यांवर पडला तरी त्यांना त्रास होतो. कदाचित हेच कारण आहे की, मीडियाला अनेकदा त्यांच्या संतापाचा सामना करावा लागला.

टॅग्स :जया बच्चनकरण जोहर