Join us

जावेद अख्तर यांनी घेतली वीरेंद्र सेहवाग, योगेश्वर दत्तची हजेरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 18:39 IST

दिल्लीच्या रामजस महाविद्यालयातील हिंसेनंतर चर्चेत आलेली दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिची ट्विटरवर खिल्ली उडविणाºया क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, पैलवान ...

दिल्लीच्या रामजस महाविद्यालयातील हिंसेनंतर चर्चेत आलेली दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिची ट्विटरवर खिल्ली उडविणाºया क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, पैलवान योगेश्वर दत्त यांची लेखक जावेद अख्तर यांनी हजेरी घेतली. कमी शिकलेल्या आणि पैलवानांनी शहीदाच्या मुलींचा केलेला अपमान मी समजू शकतो, पण उच्च शिक्षितांना झालेय काय? असा सवाल जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. त्याशिवाय चुकीच्या पद्धतीने सैनिकांच्या बलिदानावर बोलणाºया डाव्या विचारसणीच्या लोकांचा तुम्ही निषेध केला, मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेल्या हिंसाचाराबद्दल मंत्री बोलत नाही, हे चुकीचे आहे, असेही अख्तर यांनी सांगितले.कारगील युद्धात शहीद झालेल्या कॅ. मनदीप सिंह यांची कन्या गुरमेहर कौर हिने आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला घाबरत नसल्याचे सांगितले होते. यावर क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, पैलवान योगेश्वर दत्त, बबिता फोगाट यांनी ट्विट करून तिची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरूमेहर हिची बाजू घेतली होती.