Join us  

दारुच्या व्यसनामुळे मोडला जावेद अख्तर यांचा पहिला संसार; पहिल्यांदाच केलं पत्नीविषयी भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 11:21 AM

javed akhtar: शबाना आझमी यांच्यापूर्वी जावेद अख्तर यांनी हनी इराणी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती.

प्रसिद्ध गीतकार, संगीतकार जावेद अख्तर (javed akhtar) कायम त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येत असतात. कोणताही मुद्दा असला तरी ते त्यावर बेधडक आणि निर्भीडपणे भाष्य करतात त्यामुळे बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. इतकंच नाही तर त्यांच्या याच स्वभावामुळे ते अनेक वादविवादांमध्येही अडकले आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीविषयी भाष्य केलं आहे. अलिकडेच जावेद अख्तर यांनी 'मोजो स्टोरी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांची पहिली पत्नी हनी इराणी यांच्याविषयी भाष्य केलं. तसंच त्यांचा घटस्फोट का झाला यामागचं कारणही त्यांनी सांगितलं.

"जर मी जबाबदार, चांगला व्यक्ती असतो तर कदाचित परिस्थिती काही वेगळी असती. नातं अयशस्वी होण्यामागे दारुच्या आहारी जाणं हे सुद्धा एक कारण आहे. ती खूप छान आहे. तिच्याविषय़ी माझ्या मनात आजही तितकाच आदर आहे त्यामुळेच आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत", असं जावेद अख्तर म्हणाले.

दरम्यान, अलिकडेच जावेद अख्तर यांनी त्यांच्या नातीच्या शाक्या अख्तरच्या ग्रॅज्युएशन कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी हनी इराणीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. इतकंच नाही तर शबाना आझमी, फरहान अख्तर, शिबानी दांडेकरदेखील यावेळी उपस्थित होते.

जावेद आणि हनी यांनी १९७२ मध्ये लग्नगाठ बांधली होती. परंतु, १९८४ मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर जावेद यांनी शबाना आझमी यांच्यासोबत लग्न केलं. जावेद आणि हनी यांना फरहान आणि जोया ही दोन मुलं असून दोघेही कलाविश्वात सक्रीय आहेत. 

टॅग्स :जावेद अख्तरबॉलिवूडशबाना आझमीफरहान अख्तरसेलिब्रिटी