Join us

शॉर्ट डेनिममध्ये दिसला जान्हवी कपूरचा स्टनिंग अवतार, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 21:03 IST

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूूर गुरुवारी रात्री बांद्रा येथील एका रेस्टॉरेंटबाहेर पडताना बघावयास मिळाली. याठिकाणी जान्हवी तिच्या एका ...

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूूर गुरुवारी रात्री बांद्रा येथील एका रेस्टॉरेंटबाहेर पडताना बघावयास मिळाली. याठिकाणी जान्हवी तिच्या एका मैत्रिणीसोबत आली होती. यावेळी जान्हवीने स्टायलिश फुल स्लीव्स शॉट डेनिम ड्रेस घातला होता. त्याचबरोबर न्यूड बूट्स आणि गोल्ड होप्स इयररिंगही त्यावर कॅरी केले होते. या लूकमध्ये जान्हवी खूपच स्टनिंग अंदाजात बघावयास मिळत आहे. डिनरहून परताना तिने उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सला स्माइल देत पोज दिली. यावेळी जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. जान्हवी सध्या तिच्या पहिल्या ‘धडक’ या बॉलिवूड चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. धर्मा प्रॉडक्शन आणि झी स्टूडिओ बॅनर अंतर्गत बनविण्यात आलेला हा चित्रपट २० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाला शशांक खेतान यांनी दिग्दर्शित केले आहे. चित्रपटात जान्हवीच्या अपोझिट शाहिद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टर बघावयास मिळणार आहे. सध्या प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता आहे.